Anganwadi Jatra 2020 Date : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 10:10 AM2019-12-08T10:10:59+5:302019-12-08T10:11:35+5:30

Anganwadi Jatra 2020 Date : दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या जत्रौत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.

Anganwadi's Bharadi Devi Jatra on 17 February 2020 | Anganwadi Jatra 2020 Date : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला 

Anganwadi Jatra 2020 Date : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला 

googlenewsNext

सिंधुदुर्ग -  दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या जत्रौत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. प्रथेनुसार झालेली पारथ आणि नंतर देवीने दिलेल्या कौलानुसार श्री देवी भराडीचा जत्रौत्सव 17 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. 
आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद (कौल) लावण्यात आला. देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख  निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

आंगणेवाडीच्या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.  देवीला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात. यात्रोत्सव दीड दिवस चालतो. मंत्रिमहोदयही उपस्थित असतात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तारीख ठरवितात.  

दरवर्षी किमान १० लाख भाविक दोन दिवसात दर्शनासाठी येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक मिळून १५०० कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या किमान ५ ते ६ बैठका होतात.

Web Title: Anganwadi's Bharadi Devi Jatra on 17 February 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.