शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील मुलांना धोका

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

हुमलेटेंब शाळा : शाळेच्या फरशीखाली विंचू, सरपटणारे प्राणी

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ हुमलेटेंब शाळेच्या अंगणवाडी वर्गातील फरशा पूर्णपणे निखळून आल्या आहेत. या फरशांच्या फटीमध्ये विंचू, सरपटणारे प्राणी यांचा सहवास असल्याने छोट्या मुलांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित खात्याकडे लेखी तसेच तोंडी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची गंभीरपणे दखल संबंधित खात्याने न घेतल्यास मुलांना शाळेमध्ये पाठविणार नाही असा इशारा पालकांनी दिला आहे. सह्याद्री पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये नाटळचा सहभाग आहे. या अंगणवाडीच्या बाजूचा परिसर हा जंगलमय व दलदलीचा आहे. नजीकच तळे आहे. येथे बहुतांश सरपटणारे प्राणी तसेच हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका विद्यार्थ्याला विंचवाने दंश केला होता. त्याचप्रमाणे अंगणवाडीला लागूनच असलेल्या प्राथमिक शाळेच्या एका वर्गात दोन सापांचा रहिवास असल्याचे आढळून आले होते. शिक्षकांनी प्रसंगावधानता राखून विद्यार्थ्यांचा जीव वाचवला होता. या घटना ताज्या असताना अशाप्रकारचे प्रसंग छोट्या मुलांवर येवू नये यासाठी पालकांनी सावधानतेचा इशारा संबंधित खात्याला दिला आहे.तळेवाडी, विकासवाडी, हुमलेटेंब या तीन वाडीतील मुले या अंगणवाडीमध्ये येतात. येथे कार्यरत असलेल्या अंगणवाडी शिक्षिकेने पदाचा राजीनामा दिल्याने हे पद गेले पाच महिने रिक्त झाले आहे. अंगणवाडी सेविकाच अंगणवाडी चालविते. शिक्षिका नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा व शासन पुरवित असलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ होत नसल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे. अंगणवाडी शिक्षिकेचे पद लवकरात लवकर भरण्यात यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनेची गंभीरपणे दखल संबंधित खात्याने घेऊन वर्गामध्ये नवीन फरशा बसवाव्या. अन्यथा मुलांच्या बैठकीची वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)४गेली दोन वर्षे नाटळ हुमलेटेंब शाळेतील समस्येबाबत व्यवस्थापन समिती, शिक्षकांनी लेखी पत्र शिक्षण विभागाला दिले होते. याबाबतची पोचही शाळा व्यवस्थापक अध्यक्षांनी स्वत: निवेदन देऊन घेतली होती. लोकप्रतिनिधींनाही यासंबंधी कळविण्यात आले होते. परंतु सर्वांनीच या घटनेची दखल घेतली नाही. याबाबत पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाठपुरावा करुनही संबंधीत या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.