आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:28 IST2025-02-11T16:28:25+5:302025-02-11T16:28:44+5:30
सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय होणार

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
Anganewadi Jatra 2025 Special Train: मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेसाठी भाविकांच्या मागणीनुसार कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. आंगणेवाडी यात्रा २२, २३ फेब्रुवारी रोजी होत आहे.
गाडी क्रमांक ०११३४ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष गाडी सावंतवाडी येथून २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३४ लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी एलटीटी येथून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.
गाडी क्रमांक ०१०२९ एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२:५५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष गाडी सावंतवाडी येथून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
गाडी क्रमांक ०११३१ एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल एलटीटी येथून २२ फेब्रुवारी रोजी १२:५५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड ते एलटीटी विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. या गाड्यांमुळे आंगणेवाडी यात्रेसाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे.