Aaditya Thackeray: बंड आणि उठाव करायला हिंमत लागते, ती या गद्दारांमध्ये नाही; आदित्य ठाकरे बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:51 PM2022-08-01T12:51:32+5:302022-08-01T13:08:19+5:30

बंडखोरांनी केलेली गद्दारी ही फक्त शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसून ही गद्दारी माणुसकीसोबत

Aditya Thackeray's challenge to the rebels to face the election by resigning MLA | Aaditya Thackeray: बंड आणि उठाव करायला हिंमत लागते, ती या गद्दारांमध्ये नाही; आदित्य ठाकरे बरसले

Aaditya Thackeray: बंड आणि उठाव करायला हिंमत लागते, ती या गद्दारांमध्ये नाही; आदित्य ठाकरे बरसले

googlenewsNext

कुडाळ : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर बंडखोर नेते आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच काल, रविवारी पत्राचाळ आर्थिक घोटाळा गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईटीने अटक केली. यामुळे राज्यातील वातावरण तणावपुर्ण बनले आहे. अशाच शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरु केली असून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे आज कोकणात दाखल झाले आहेत. कुडाळ येथून त्यांनी बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

आदित्य ठाकरें म्हणाले, बंड आणि उठाव करायला हिंमत लागते. ती हिंमत या गद्दारांमध्ये नाही. हिंमत असती तर या गद्दारांनी इथं राहून बंड केले असते. त्यासाठी सुरत, गुवाहाटीकडे जायची गरज नव्हती. महाराष्ट्राची वृत्ती असी नाही असे खडसावत राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे या असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिले.

ही गद्दारी माणुसकीसोबत

बंडखोरांनी केलेली गद्दारी ही फक्त शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसून ही गद्दारी माणुसकीसोबत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या बंडखोर नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांनी गद्दारी केली. इतक घाणेरडे राजकारण मी कधीही पाहिले नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती की पक्ष फोडा, गद्दारी करा. ज्या माणसाने घडवले, ओळख दिली त्याच माणसाच्या पाठित या बंडखोरांनी खंचीर खुपसला.

शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ‘शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे’ असे म्हणत ईडीच्या कारवाईचा त्यांनी निषेध करत भाजपवर निशाणा साधला.

Web Title: Aditya Thackeray's challenge to the rebels to face the election by resigning MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.