शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत बीडमध्ये कारवाई : नऊ गुन्हेगारांचा समावेश, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

By admin | Updated: May 9, 2014 00:18 IST

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्समधून आठ दिवसांपूर्वी सात लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या टोळक्यातील एका आरोपीच्या

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्समधून आठ दिवसांपूर्वी सात लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या टोळक्यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. नितीन भास्करराव पोपटघट (वय २६) असे या आरोपीचे नाव असून त्याला बीड जिल्ह्यातील गेवराई लोहारगल्ली येथील त्याच्या राहत्या घरी बुधवारी सायंकाळी ७ वाजता मोठ्या शिताफीने या पथकाने ताब्यात घेतले आहे. या चोरी प्रकरणात एकूण ९ गुन्हेगारांचा समावेश असून, यात ५ महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथील कावेरी काळे, सोनी, शीतल, शेवंत व अन्य एक महिला तर नितीन पोपटघट, उमेश परदेसी तसेच दोन मुले ्रअशा एकूण नऊजणांनी२९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता या टोळीने कणकवली येथील दीपक बेलवलकर यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथे चोरी करण्याचा डाव फसल्यामुळे ही टोळी पांढर्‍या रंगाच्या स्वीफ्ट कारमधूनरवाना झाली. सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्स शॉपमधून सोने चोरी करण्याच्या इराद्याने या महिलांनी त्या शॉपमध्ये प्रवेश केला. यातील नितीन पोपटघट हा कारमध्येच बसला होता. महिलांनी शॉपमध्ये प्रवेश करताच तेथील २५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या त्यातील एका महिलेने चोरल्या. त्याबाबतचे चित्रीकरणही सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये कॅच झाले होते.