शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमार्केटसाठी ८0 लाखांचा निधी प्राप्त

By admin | Updated: July 7, 2015 23:17 IST

अशोक तोडणकर : दोन महिन्यात काम होणार पूर्ण

मालवण : मालवण नगरपरिषदेने सोमवारपासून हाती घेतलेल्या मच्छिमार्केट नूतनीकरणासाठी शासनाकडून ७९.०६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मत्स्यविक्रेत्या महिला व ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा पालिकेचा निर्धार असून दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी दिली. या नव्या दमाच्या मच्छिमार्केटमध्ये ८० ते १०० मत्स्यविक्रेत्या महिलांची बैठक व्यवस्था असणार आहे. तसेच मासे साठवून ठेवण्यासाठी पालिकेने कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था केली आहे. दरम्यान मत्स्य विक्रेत्या महिलांसाठी भाजी मंडईत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मच्छिमार्केटमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेने मच्छिमार्केट नूतनीकरण करण्याचा पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून नुतनीकरणाचे काम सुरु झाले आहे. ग्राहकांना व मत्स्यविक्रेत्या महिलांना अडचण येवू नये यासाठी मच्छिमार्केटचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यात ८० ते १०० मच्छी विक्रेत्या महिलांसाठी बैठक व्यवस्था असणार आहे. दरदिवशी मासे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांकडून ३०० रुपये इतका मासिक शुल्क आगाऊ स्वरुपात घेतला जाणार असून गाळा राखीव ठेवण्यात येणार आहे. तर आठवाड्यातून दोन-तीन दिवस मासे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांकडून प्रतिदिन १० रुपये शुल्क आकारून मोकळ्या जागेत बैठक व्यवस्था करून देण्यात येणार आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)मासे विक्री हे महिलांच्या रोजगाराचे मुख्य साधन आहे. येथील मत्स्य विक्रेत्या महिला व ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. सध्याच्या मच्छिमार्केटमुळे महिला व ग्राहकांना त्रास अथवा अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी पालिकेने पुढाकार घेत अद्ययावत मच्छिमार्केट उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महिलांनी या कामाला विरोध दर्शवला होता. मात्र, मी दिलेल्या आवाहनाला मत्स्य विक्रेत्या महिलांनी पाठींबा दर्शवला. मासे विक्रीसाठी लगतच्या भाजी मंडईत व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच मच्छिमार्केटचे काम पूर्ण करून ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. यासाठी मालवण नगरपरिषद कार्यरत आहे.- अशोक तोडणकर, नगराध्यक्ष, मालवणमासे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज पालिकेच्यावतीने मत्स्य विक्रेत्या महिलांसाठी मच्छिमार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विक्रीचे मासे शिल्लक राहिल्यास मासे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज फायदेशीर ठरणार आहे. तसेच विद्युतीकरण व पाण्याचीही व्यवस्था करून देण्यात येणार आहे. कोल्ड स्टोअरेजमध्ये मच्छी विक्रेत्या महिलांसाठी लॉकर प्रणाली असणार आहे.