शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भासवून लुटणाऱ्याला सांगलीतून अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:16 IST

तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी आरोपीला विश्रामबागेहून घेतले ताब्यात

वेंगुर्ला : पोलिस असल्याचे सांगून वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील वृद्ध नागरिकांकडून सोन्याचे किमती दागिने लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीतून अटक केली आहे. या लुटारू आरोपीचे नाव अबुतालीब मुसा इराणी (वय ३१, राहणार इराणी वस्ती, सांगली) असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस असल्याचे भासवून वेंगुर्ला येथील नागरिकाची सोन्याची वस्तू लुटल्याची तक्रार वेंगुर्ला पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. त्याच दिवशी सावंतवाडी पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना संदिग्ध आरोपी सांगली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी चार दिवस कसून तपास करून विश्रामबाग परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ फिरत असणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने चोरीचे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला वेंगुर्ला पोलिस ठाण्यात अटक केली गेली. न्यायालयात हजर केल्यावर त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस आणि पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.

१८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

  • वेंगुर्ला आणि सावंतवाडीतील वृद्धांकडून पोलिस असल्याचे भासवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या अबुतालीब मुसा इराणी याला सांगलीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
  • तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताचा मागोवा घेतल्यावर विश्रामबाग परिसरात त्याला ताब्यात घेतले गेले; त्याने चोरीची कबुली दिली.
  • आरोपीला न्यायालयात हजर करून १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.