मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर अपघात; डंपर चालक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:08 IST2022-06-01T08:08:25+5:302022-06-01T08:08:59+5:30

ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडरवर चढला व मागील डंपरचा चालक कॅबिनमध्ये अडकून पडला.

accident on zarap patradevi bypass on mumbai goa highway at sindhudurg dumper driver died on the spot | मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर अपघात; डंपर चालक जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर अपघात; डंपर चालक जागीच ठार

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपरला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागाहून येणाऱ्या डंपरचा चालक जागीच ठार झाला. 

ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडरवर चढला व मागील डंपरचा चालक कॅबिनमध्ये अडकून पडला. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. परशुराम चिन्नी राठोड (२४ रा. गुढीपूर कुडाळ, मूळ राहणार विजापूर कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव असून त्याला जेसीबीच्या सहाय्याने डंपर मागे खेचून गाडीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांसह डंपर चालक-मालक उपस्थित असून सावंतवाडी पोलीसही दाखल झाले आहेत.
 

Web Title: accident on zarap patradevi bypass on mumbai goa highway at sindhudurg dumper driver died on the spot