शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

चिपी विमानतळ टर्मिनल उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 12:07 PM

चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत याचा निषेध केला.

ठळक मुद्देचिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. चित्रीकरणासाठी उभ्या असलेल्या मीडियाच्या पत्रकारांना भाजपाच्या सदाशिव ओगले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

चिपी (सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत याचा निषेध केला.

चिपी येथे आज टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जिल्हाभरातून पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी दाखल झाले होते. मात्र आयआरबी कंपनीने पत्रकारांना बसण्यासाठी व्हीआयपी कक्षाच्या पाठीमागे व्यवस्था केली. यात चित्रीकरणासाठी उभ्या असलेल्या मीडियाच्या पत्रकारांना भाजपाच्या सदाशिव ओगले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावर संतप्त पत्रकारांनी त्यांना याचा जाब विचारला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही पत्रकारांनी चांगलेच धारेवर धरले. यात वाद निर्माण झाल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिस अधीक्षक तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत त्यांना बाहेर काढले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. 

वाद झाल्याचे लक्षात येताच भाजपाचे प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक यांनी बाहेर येत झालेल्या प्रकाराची माफी मागत ज्याने अपमान केला त्याला बाहेर काढत तुमच्या बसण्याची व्यवस्था केली आहे असे सांगितले. मात्र जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या. यावर जठार यांनी तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगत पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेत बसविले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी (5 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. साडेतीन किमीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्याभविष्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खासगी विमान उतरविण्यात आले होते. मात्र आज अधिकृतरित्या शासकीय उद्घाटन झाले आहे. चिपी विमानतळ जिल्ह्यातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना होणार आहे.  

गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच 'आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो', असा टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. सिंधुदुर्गचिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSuresh Prabhuसुरेश प्रभू