अमिर खान पोलीस अधीक्षक कार्यालयात आला अन् साधेपणाने मनं जिंकून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 22:45 IST2020-12-29T22:44:09+5:302020-12-29T22:45:01+5:30

प्रसिद्धीच्या झोतात असूनही साधेपणा भावला 

Aamir Khan came to the office of the Superintendent of Police and simply won my heart | अमिर खान पोलीस अधीक्षक कार्यालयात आला अन् साधेपणाने मनं जिंकून गेला

अमिर खान पोलीस अधीक्षक कार्यालयात आला अन् साधेपणाने मनं जिंकून गेला

ठळक मुद्देप्रसिद्ध अभिनेता अमिर खान हे मंगळवारी हेलिकॉप्टर घेऊन सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले पोलीस परेड मैदानावर त्याचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर अभिनेता अमिर खान चक्क कारमध्ये बसून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला.

अनंत जाधव 

सावंतवाडी : चित्रपटात एखादा अभिनेता पोलीस ठाण्यात एन्ट्री घेतो सर्वजण त्याला उठून खुर्च्या देतात स्वागत करतात तसाच सीन मंगळवारी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहायला मिळाला सर्व काहि चित्रपटात शोभेल असेच होते.पण प्रत्यक्षात चित्रपटाचे ते शूटिंग नव्हते.प्रसिद्ध अभिनेता अमिर खान हा खाजगी दौर्‍यानिमित्त सिंधुदुर्ग मध्ये आला असून काहि क्षणासाठी त्याने अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन आल्या पाऊली निघून गेला.अचानक अमिरच्या झालेल्या एन्ट्रीने पोलीसही चक्रावून गेले.त्याचाही विश्वास बसत नव्हता

प्रसिद्ध अभिनेता अमिर खान हे मंगळवारी हेलिकॉप्टर घेऊन सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले पोलीस परेड मैदानावर त्याचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर अभिनेता अमिर खान चक्क कारमध्ये बसून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला. अमिरच्या या अधीक्षक कार्यालयातील एन्ट्री ने चित्रपटातील एखाद्या सीनची आठवण व्हावी अशी ही एन्ट्री होती फक्त येथे कॅमेरे वैगरे काही नव्हते. अमिर खान हे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर थेट पोलीस अधीक्षक यांच्या भेटीसाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले, तेथे अवघी दहा मिनिटांत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथून ते बाहेर पडले. मात्र, तोपर्यंत अमिर खान पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बातमी पोलीसात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांनी फोटो- सेल्फीसाठी धावाधाव केली खरी पण तोपर्यंत उशिर झाला होता. अमिर खान कार मध्ये बसून निघून गेला मात्र अमिरच्या साधेपणाची चर्चा पोलिसासह कर्मचारी वर्गात रंगू लागली. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एखादा प्रसिद्ध अभिनेता अधीक्षक कार्यालयात आला आणि आपल्या साधेपणाने मन जिंकून गेला. याबाबत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी अमिर कामानिमित्त आले होते. आपले काम झाल्यावर गोव्याच्या दिशेने ते निघून गेल्याचे सांगितले.
 

Web Title: Aamir Khan came to the office of the Superintendent of Police and simply won my heart