Sindhudurg: कणकवलीत तरुण मृतावस्थेत आढळला

By सुधीर राणे | Published: May 27, 2024 12:34 PM2024-05-27T12:34:30+5:302024-05-27T12:35:27+5:30

कणकवली : कलमठ-मुस्लिमवाडी येथील इम्तियाज मेहबूब धारवाडकर (वय ४३) हा येथील नरडवे नाक्यानजीक असलेल्या बेंचवर मृतावस्थेत पडलेला आढळून आला. ...

A youth was found dead in Kankavli | Sindhudurg: कणकवलीत तरुण मृतावस्थेत आढळला

Sindhudurg: कणकवलीत तरुण मृतावस्थेत आढळला

कणकवली : कलमठ-मुस्लिमवाडी येथील इम्तियाज मेहबूब धारवाडकर (वय ४३) हा येथील नरडवे नाक्यानजीक असलेल्या बेंचवर मृतावस्थेत पडलेला आढळून आला. ही घटना काल, रविवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज धारवाडकर हा रविवारी दुपारच्या सुमारास नरडवे नाक्यानजीक फुटपाथवर असलेल्या एका बेंचवर येऊन बसला होता. दरम्यान तेथे जवळच असलेल्या भेळपुरी स्टॉलधारकाने सायंकाळी पाहिले असता, इम्तियाज याच्या शरीराची हालचाल होत नव्हती. स्टॉलधारकाने इम्तियाज याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. तरीही काहीच हालचाल न झाल्याने त्याने इतरांना सांगितले.

घटनास्थळी काही नागरिकही दाखल झाले. त्यांनी कळविल्यानुसार कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक चंद्रकांत माने घटनास्थळी आले. इम्तियाज याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात  आली आहे. 

इम्तियाज सेन्ट्रीगचे काम करायचा. त्याला बरे वाटत नसल्याने तो रुग्णालयातही गेला होता. मात्र, रविवारी तो नरडवे नाका येथे कशासाठी आला होता ? अथवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हे समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: A youth was found dead in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.