Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 18, 2023 12:24 PM2023-09-18T12:24:23+5:302023-09-18T12:24:49+5:30

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मशवी मुणगे रस्त्यावर आज, सोमवारी सकाळी अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली. यातील युवक रक्तबंबाळ ...

A youth in a car died in an accident on Mashvi Munge road in Devgad taluka | Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला

Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला

googlenewsNext

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मशवी मुणगे रस्त्यावर आज, सोमवारी सकाळी अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली. यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. 

गाडीचा पुढील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत असून काचीवर, बोनेटवर, दरवाजावर अवजड वस्तूने आघात केल्यासारख्या खुणा दिसून येत आहेत. याबाबत माहिती मिळताच देवगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम, राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोंबरे यांसह डॉग स्कॉड, फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहेत.

Web Title: A youth in a car died in an accident on Mashvi Munge road in Devgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.