Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:26 IST2026-03-26T13:25:23+5:302026-03-26T13:26:02+5:30

घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आठवड्यातील दुसरा प्रकार 

A tanker full of fuel overturned in Karul Ghat | Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

वैभववाडी : करुळ घाटातील एका वळणावर इंधन घेऊन सिंधुदुर्गात येणारा टँकर गटारात उलटला. हा अपघात बुधवार, २५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या अपघातात टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. 

पेट्रोल व डिझेल भरलेला टँकर (एमएच ०७; एस १२३४) मिरजेहून सिंधुदुर्गात येत होता. करुळ घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर गटारात उलटला. त्यामुळे टँकरमधील पेट्रोल व डिझेल काही प्रमाणात वाहून गेले. त्यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, हरीश जायभाय, माने आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. इंधन गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कणकवली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

या पथकाच्या माध्यमातून अपघातस्थळी पाणी मारून मार्ग सुरक्षित करण्यात आला. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title : सिंधुदुर्ग घाट में ईंधन टैंकर पलटा, बड़ा हादसा टला

Web Summary : सिंधुदुर्ग के करुळ घाट में ईंधन से भरा टैंकर पलट गया, लेकिन एक बड़ा हादसा टल गया। चालक को मामूली चोटें आईं। ईंधन के रिसाव के कारण दमकल विभाग को बुलाया गया, जिससे यातायात बाधित हुआ, जिसे बाद में बहाल कर दिया गया।

Web Title : Tanker Overturns in Sindhudurg Ghat, Major Accident Averted

Web Summary : A fuel tanker overturned in Karul Ghat, Sindhudurg, but a major accident was averted. The driver sustained minor injuries. Fuel leakage prompted a fire brigade response, briefly disrupting traffic before normalcy was restored.