कणकवलीत एका रात्रीत रस्त्यालगत शिवरायांचा नवीन पुतळा; जुना पुतळाही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:01 IST2022-07-07T12:01:05+5:302022-07-07T12:01:58+5:30

पुतळा स्थलांतरणाचा वाद सुरू असतानाच नव्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे.

A new statue of chhatrapati Shivaji Maharaj by the roadside in Kankavali one night | कणकवलीत एका रात्रीत रस्त्यालगत शिवरायांचा नवीन पुतळा; जुना पुतळाही कायम

कणकवलीत एका रात्रीत रस्त्यालगत शिवरायांचा नवीन पुतळा; जुना पुतळाही कायम

कणकवली- गेले काही महिने चर्चेत असलेल्या शहरातील छ. शिवाजी महाराज चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा लगतच्या जागेत बसविण्यात आला आहे. बुधवारी एका रात्रीत हा पुतळा नवीन जागेत स्थापन करण्यात आला आहे. पुतळा स्थलांतरणाचा वाद सुरू असतानाच नव्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही दिवस मागणी होत असलेल्या दीपनाईक यांच्या फॅब्रिकेशनच्या जागेत एका रात्रीत हा पुतळा बसविण्यात आला. मात्र तूर्त तरी जुना पुतळा जागेवरच असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सर्विस रोडच्या मधोमध येणाऱ्या पुतळा स्थलांतराचा विषय गेले काही महिने सुरू होता. याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी सहा महिन्यापूर्वी बैठक घेऊन महिनाभरात पुतळा स्थलांतर होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या पुतळ्यामुळे सर्विस रोडच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्याने पुतळा स्थलांतर तातडीने करण्याची मागणी सुरू होती. अखेर बुधवारी एका रात्रीत नवीन पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा कोणी बसवला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

Web Title: A new statue of chhatrapati Shivaji Maharaj by the roadside in Kankavali one night