Crime News in Sindhudurg: बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण, संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:17 IST2023-01-10T16:16:53+5:302023-01-10T16:17:36+5:30
संशयितावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News in Sindhudurg: बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण, संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात
कणकवली : कणकवली मधील एक अल्पवयीन मुलगी महाविद्यालयातून घरी येत असताना पाठीमागून येत तिच्या कानाखाली मारल्याने संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान याबाबत तपासी अधिकारी वृषाली बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पीडित१७ वर्षीय मुलगी महाविद्यालयामधून घरी येत होती.त्यावेळी तिच्या पाठीमागून आलेल्या त्या कणकवली तालुक्यातील २४ वर्षीय युवकाने 'माझ्यासोबत बोल', असे त्या मुलीला सांगितले. त्यावेळी त्या मुलीने नाही म्हणताच त्या युवकाने तिच्या कानाखाली मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कणकवलीत हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबतच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित युवकावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.