सावंतवाडी जवळ बिबट्या पडला विहिरीत; कुत्र्याची शिकार करणं आलं आंगलट
By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2022 17:19 IST2022-09-11T17:17:59+5:302022-09-11T17:19:34+5:30
सावंतवाडी जवळील गावात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला.

सावंतवाडी जवळ बिबट्या पडला विहिरीत; कुत्र्याची शिकार करणं आलं आंगलट
सिंधुदुर्ग : कोंबड्यासह भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी गावात आलेल्या बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील रूपेश सावळ यांच्या विहिरीत पडला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र यांची माहिती वनविभागाला मिळताच त्यानी या बिबट्याला सुखरूप पणे बाहेर काढत जंगलात सोडले आहे. न्हावेली येथील नागझरवाडी येथे रूपेश सवाळ यांच्या विहिरीत बिबटया पडला असल्याचे दिसले यांची माहिती लागलीच वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर यांच्यासह बचाव पथक न्हावेली गावात पोहचले.
बिबट्याला पकडण्यात आले यश
बिबट्या पडलेली विहिरीत ही चिरेबंदी असून 40 फुट खोल आहे. कठड्यापासून सध्याची पाण्याची पातळी अंदाजे 15 फुटावर असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे गृहीत धरून उपाय योजना आखण्यात आली. हा बिबट्या रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आला असावा. अंधारामुळे त्याला विहिरी समजली नसल्यानेच तो विहिरीत पडल्याचे वनविभागाने सांगितले त्यातच विहिरीत गुहेसारखी भगदाड असल्याने त्यात हा बिबट्या जाऊन बसला होता. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ विहिरीकडे जमू लागल्याने वनविभागाला बचाव कार्य हाती घेतना अनेक अडचणी येऊ लागल्या. अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने लोखंडी पिंजरा विहिरीत सोडत अलगद पणे बिबट्याला कैद केले. हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा होता.
बिबट्याला पकडताच वन्यजीव वैद्यकीय डॉक्टर यांचेकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचावकार्यात न्हावेलीच्या ग्रामस्थांकडून मोठी मदत झाल्याचे वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी सांगितले यावेळी वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर आदि बचाव पथकात सहभागी झाले होते.