शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: जादा परताव्याच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक, एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

By सुधीर राणे | Updated: April 10, 2025 17:44 IST

कणकवली : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० ते १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या ...

कणकवली : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० ते १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, खांबलवाडी येथील स्वप्निल शांताराम बेळेकर, विनया स्वप्निल बेळेकर या पती-पत्नी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात सर्वेश हरी भिसे यांच्यानंतर आणखी ६ जणांनी एकूण ७८ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करत एम. पी. आय. डी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, या बेळेकर दांपत्याकडून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केले आहे.बेळेकर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये संगीता अच्युतराव वणवे यांची ५१ लाख ५० हजार, अरुण राधाकृष्ण इंगळे यांची १ लाख, गौतम विठ्ठल कासले यांची ३ लाख, महानंदा देऊ पवार यांची ६ लाख २० हजार, धोंडू विलास बिडये यांची ११ लाख ५५ हजार, सुरेखा पिराजी कांबळे यांची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कणकवली पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. स्वप्निल आणि विनया या पती-पत्नीने आपल्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे या तक्रार अर्जात नमूद केले असून स्वप्निल बेळेकर आणि त्याची पत्नी विनया बेळेकर विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा कलम ३, ४ तसेच बी एन एस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.या तक्रार अर्जाची प्रत माहितीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांना पाठवली आहे. गुन्ह्यात अटकेत असलेला स्वप्निल याला सुनावलेल्या पोलिस कोठडीची मुदत ९ एप्रिल रोजी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस