जिल्ह्याचे ७ टक्के पाणी दूषित

By Admin | Updated: January 29, 2015 23:43 IST2015-01-29T22:16:35+5:302015-01-29T23:43:26+5:30

रत्नागिरी जिल्हा : आरोग्य विभागाच्या पाणी शुध्दीकरणाच्या सूचना

7 percent water contamination in the district | जिल्ह्याचे ७ टक्के पाणी दूषित

जिल्ह्याचे ७ टक्के पाणी दूषित

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये जिल्ह्यातील ७ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे पाणी शुध्दिकरणाच्या सूचना आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींना दिली आहे़
अशुध्द पाण्यामुळे अनेक आजार पसरतात़ त्यामुळे साथींच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ त्यासाठी पाणी गाळून, शुध्द करुन तसेच गरम करुन प्यावे, अशी जनजागृती गावोगावी आरोग्य विभागाकडून करण्यात येतो़ तसेच पाणी शुध्दिकरणासाठी तुरटी, मेडिक्लोरचा वापर करण्यात येतो़ दर महिन्यात असा अहवाल तयार केला जातो. यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताचीही तपासणी केली जाते.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अशुध्द पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरीही ग्रामीण भागातील अनेक स्त्रोत हे अजूनही दुषित आहेत. त्यांना पाणी शुध्दीकरणाबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाकडून पाणी तपासणी प्रत्येक महिन्यात करण्यात येते़ त्यासाठी विहिरी, तलाव, नळपाणी योजना व पाणी पुरवठ्याच्या अन्य साधनांतून पाण्याचे नमुने ग्रामपंचायत तसेच आरोग्य केंद्रांमार्फत गोळा करण्यात येतात़ मागील महिन्यात जिल्हाभरातून पाण्याचे २२७३ नमुने गोळा करण्यात आले होते़ त्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली़ त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, पाण्याचे १५५ नमुने म्हणजेच ७ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ ही दूषित पाण्याची आकडेवारी पाहता इतर जिल्ह्यांपेक्षा फार कमी आहे आणि या दुषित पाण्याबाबतही उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्मल ग्रामपंचायतींचे प्रमाणही जास्त असल्याने दूषित पाण्याचे प्रमाण कमी आहे़ (शहर वार्ताहर)

तालुकादूषित पाण्याची
टक्केवारी
मंडणगड१४
दापोली५
खेड९
गुहागर३
चिपळूण६
संगमेश्वर५
रत्नागिरी११
लांजा८
राजापूर६
एकूण६७

Web Title: 7 percent water contamination in the district