सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ गावांना दरड कोसळण्याचा धोका, आपत्ती विभागाकडून यंत्रणा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:51 IST2025-05-28T18:48:38+5:302025-05-28T18:51:24+5:30

आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण ; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

43 villages in Sindhudurg district at risk of landslides | सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ गावांना दरड कोसळण्याचा धोका, आपत्ती विभागाकडून यंत्रणा तैनात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ गावांना दरड कोसळण्याचा धोका, आपत्ती विभागाकडून यंत्रणा तैनात

ओरोस  : मुसळधार किंवा अती मुसळधार पावसाच्या वेळी काही ठिकाणी दरड कोसळते. अशा ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार या ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.

यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.

राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणे

देवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)

कोकण रेल्वे मार्गावरील  दरडग्रस्त ठिकाणे

वैभववाडी-लाडवाडी ॲप्रोच कटिंग, गोपालवाडी ॲप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंत्रणा तैनात

आपत्कालीन परिस्थितीतील या दरडप्रवण ठिकाणांवर दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी लागणारी यंत्रणा आपत्ती विभागाकडून तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिकांनी या ठिकाणांबाबत सदैव जागृत राहवे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 43 villages in Sindhudurg district at risk of landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.