सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ३० कोटींची थकबाकी 

By सुधीर राणे | Published: January 2, 2024 12:16 PM2024-01-02T12:16:24+5:302024-01-02T12:16:40+5:30

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८७ हजार ६२१ वीज ग्राहकांकडे ३० कोटी ५९ लाख एवढी थकबाकी आहे. ही वीज देयकांची ...

30 crore due to electricity consumers in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ३० कोटींची थकबाकी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ३० कोटींची थकबाकी 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८७ हजार ६२१ वीज ग्राहकांकडे ३० कोटी ५९ लाख एवढी थकबाकी आहे. ही वीज देयकांची थकबाकी न भरल्यास संबधित ग्राहकांचा  वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वापरताय तर जरा बिल भरून सहकार्य करा,असे आवाहन वीज वितरणकडून करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील वीज बील थकबाकीमध्ये पथदिपांची ९ कोटी ४२ लाखांची सर्वाधिक थकबाकी आहे. शेती पंप विद्युत पुरवठा होणा-या ग्राहकांकडे ५ कोटी ३४ लाख एवढी थकबाकी आहे. कणकवली विभागातील ४१ हजार १३२ ग्राहकांकडे १५ कोटी २२ लाख तर कुडाळ विभागातील ४६ हजार ४८९ ग्राहकांकडे १५ कोटी ३७ लाख अशी  जिल्ह्यात एकूण  ३०  कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे. 

जिल्ह्यात घरगुती  ५८ हजार ४३५ ग्राहकांकडे ७ कोटी १७ लाख , वाणिज्य ५ हजार ३६१ ग्राहकांकडे २ कोटी ५ हजार , औद्योगिक १ हजार ६१ ग्राहकांकडे १ कोटी १३लाख शेतक-यांसाठी शेती पंप विज पुरवठा होत असलेल्या १६ हजार ५८४ ग्राहकांकडे ५ कोटी ३४ लाख , शेतीशी निगडीत २६४ विज ग्राहकांकडे २२ लाख , विविध गावांमध्ये पथदीप विज पुरवठा २ हजार ४८८ ग्राहकांकडे ९ कोटी ४२ लाख , नळपाणी योजना विज पुरवठा १ हजार ३४३ ग्राहकांकडे ४ कोटी ११ लाख , शासकीय व निमशासकीय विज पुरवठा होत असलेल्या २ हजार ८६ग्राहकांकडे १ कोटी १४ लाख एवढी थकबाकी आहे. 

कणकवली उपविभागात वीज वितरण कंपनीची घरगुती ग्राहक  २७ हजार ३०२ ग्राहकांकडे ३ कोटी १० लाख, वाणिज्य २ हजार १८५ ग्राहकांकडे ८१ लाख, औद्योगिक ४१६ ग्राहकांकडे ६२ लाख, कृषीपंप २ कोटी ५६ लाख, शेती निगडीत ग्राहक १६ लाख , पथदीप योजना ४ कोटी ५० लाख, नळ पाणी पुरवठा योजना २ कोटी ९९ लाख, शासकीय कार्यालये ४९ लाख अशी थकबाकी आहे.  कणकवली उपविभागातील आचरा , देवगड , कणकवली , मालवण , वैभववाडी येथील ४१ हजार १३२ ग्राहकांकडे १५ कोटी २२ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे. 

कुडाळ उपविभागात वीज वितरण कंपनीची ३१ हजार १३३ घरगुती ग्राहकांकडे ४कोटी ८लाख, वाणिज्य ३ हजार १७६ ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख, औद्योगिक ६४५ ग्राहकांकडे ५१ लाख, कृषीपंप २ कोटी ७९ लाख, शेती निगडीत ग्राहक ६ लाख , पथदीप  योजना ४ कोटी ९३ लाख, नळपाणी पुरवठा योजना १ कोटी १२ लाख, शासकीय कार्यालये ६५ लाख अशी थकबाकी आहे. कुडाळ उपविभागातील कुडाळ , ओरोस , सांवतवाडी , दोडामार्ग , वेंगुर्लो येथील ४६ हजार ४८९ ग्राहकांकडे १५ कोटी ३७ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे. 

ग्राहकांनी  सहकार्य करावे!

विज ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबत अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळे ग्राहकांनी आपला विद्युत पुरवठा खंडीत होण्याची कारवाई टाळण्यासाठी विज बिले भरुन सहकार्य करावे. - बाळासाहेब मोहिते,कार्यकरी अभियंता,कणकवली.

Web Title: 30 crore due to electricity consumers in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.