सिंधुदुर्गात नगराध्यक्षपदासाठी २६, नगरसेवक पदासाठी ३७३ अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:13 IST2025-11-18T15:13:23+5:302025-11-18T15:13:34+5:30
Local Body Election: तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीसाठी निवडणूक

सिंधुदुर्गात नगराध्यक्षपदासाठी २६, नगरसेवक पदासाठी ३७३ अर्ज दाखल
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सोमवारी (दि.१७ ) एकुण नगरसेवकपदाच्या ७७ जागांसाठी एकुण ३७३ तर नगराध्यक्षपदाच्या ४ जागांसाठी एकुण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता मंगळवार (दि.१८) रोजी छाननी होणार आहे.
मालवण नगरपरिषदेत नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ७६ तर नगराध्यक्षपदासाठी ६ अर्ज, वेंगुर्ल्यात नगरसेवक पदासाठी ११३ आणि नगराध्यक्षपदासाठी ८, सावंतवाडीत नगरसेवक पदासाठी १२८ आणि नगराध्यक्षपदासाठी ८ आणि कणकवली नगरपंचायतीत १७ नगरसेवक पदासाठी ५६ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ असे अर्ज दाखल झाले आहेत.
कणकवलीत शहर विकास आघाडीचा झाला क्रांतीकारी विचार पक्ष
कणकवलीत शहर विकास आघाडीच्यावतीने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि इतर १७ जणांनी क्रांतीकारी विचार पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस हे सर्वच पक्ष आपापले उमेदवार असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे भाजपा विरोधात क्रांतीकारी पक्ष अशीचा प्रमुख लढाई होणार आहे.