होडावडेत २० लाखांचा दारुसाठा जप्त, कोल्हापूर भरारी पथकाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:55 IST2022-06-14T20:55:46+5:302022-06-14T20:55:58+5:30

कारवाईत तब्बल २८६ दारुचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत.

20 lakh goa made fake liquor seized Kolhapur squads big action | होडावडेत २० लाखांचा दारुसाठा जप्त, कोल्हापूर भरारी पथकाची मोठी कारवाई

होडावडेत २० लाखांचा दारुसाठा जप्त, कोल्हापूर भरारी पथकाची मोठी कारवाई

बांदा  : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने होडावडे (ता. वेंगुर्ला) येथे एका काजू फॅक्टरी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २८६ दारुचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. यात एकूण २० लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात संशयित मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

ही कारवाई विभागीय आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशाने व विभागीय उपायुक्त के. सी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक रणजित येवलुजे, निरीक्षक अमित पाडाळकर, दुय्यम निरीक्षक वायदंडे, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यय निरीक्षक रणजित येवलुजे करीत आहेत.

Web Title: 20 lakh goa made fake liquor seized Kolhapur squads big action