शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींच्या खर्चात १५३ विकासकामे मार्गी

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

५0 कामे प्रगतीपथावर, २५ कामे प्रलंबित

सिंधुदुर्गनगरी : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघास २ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या एकूण ६ कोटी रुपयांच्या निधीपैकी मार्च २०१४ अखेर ३ कोटी २७ लाख ७८ हजार इतका खर्च झाला आहे. या खर्च झालेल्या निधीतून १५३ विकासकामे पूर्ण झाली आहेत तर २५ कामे अद्याप सुरु झालेली नाहीत.स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. यात प्रत्येक मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण व खडीकरण, वर्गखोल्या, पुलांची दुरुस्ती, समाजमंदिर बांधणे, व्यायामशाळा आदी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे ६ कोटी निधी प्राप्त झाला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात मार्च २०१४ अखेर ३ कोटी २७ लाख ७८ हजार इतका निधी विकासकामांवर खर्च झाला आहे तर अद्यापही सुमारे २ कोटी ६२ लाख रुपये एवढा निधी खर्च होणे बाकी आहे.मार्च २०१४ अखेर खर्च झालेल्या निधीतून १५३ विकासकामे पूर्ण झाली आहेत. एकूण तीनही विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी २३० विकासकामे सुचविली होती. त्यापैकी १५३ विकासकामे मार्च २०१४ अखेर पूर्ण झाली आहेत. दरम्यान, प्राप्त आमदार विकासनिधी जास्तीत जास्त खर्च करण्यास पालकमंत्री नारायण राणे हे आघाडीवर असून त्यांच्यापाठोपाठ आमदार दीपक केसरकर व आमदार प्रमोद जठार आहेत. (प्रतिनिधी)