कणकवलीत १३ लाखांची दारु जप्त ! पोलिसांची धडक कारवाई ; चालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:06 IST2020-10-20T18:04:11+5:302020-10-20T18:06:04+5:30
kankavli, liqerban, sindhdurgnews, police गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरू असलेली अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडली . तसेच संशयित आरोपी खालिक बग्गु खान ( वय ३७ रा.शिव , पी.बबेरु शक्ती , बांदा , उत्तरप्रदेश ) याच्या कडून तब्बल १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे .

गोवा ते मुंबई अशी अवैध दारू वाहतूक करत असताना कणकवली पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरू असलेली अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडली . तसेच संशयित आरोपी खालिक बग्गु खान ( वय ३७ रा.शिव , पी.बबेरु शक्ती , बांदा , उत्तरप्रदेश ) याच्या कडून तब्बल १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे .
गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका आयशर टेम्पो ( क्रमांक एम. एच. ४३- वाय. ८१६७ ) असा जात असून संबंधित टेम्पो हा गोवा बनावटीची दारु वाहतुक करीत आहे . अशी माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती.
त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे पोलीस पथक तैनात करण्यात आले. समोरून येणाऱ्या आयशरला थांबण्याचा इशारा पोलीसांनी केला. परंतु , तो न थांबता कणकवलीच्या दिशेने वेगाने निघून गेला. त्यावेळी त्याचा पाठलाग करुन सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील नरडवे नाक्याच्या दरम्यान त्या टेम्पोला थांबवण्यात आले .
टेम्पोच्या हौद्याच्या दरवाजाला कंपनीचे सिल असल्याने पंच घेऊन त्यांच्या समक्ष सिल न तोडता वरील नट खोलून टेम्पोची तपासणी करण्यात आली . यावेळी आतमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. त्यात १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू होती.
या दारूसह वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला १० लाख रुपये किंमतीचा आयशर असा एकूण २२ लाख ९७ हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .
या प्रकरणी पोलीस नाईक रुपेश धोंडु गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालक पसार !
याप्रकरणात जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या दारूचा मालक हा मूळ गुजरात येथील असून सध्या तो गोवा, पणजी येथे राहत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली . त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी हे पथकासह गोवा येथे रवाना झाले. मात्र संशयित आरोपी हा तेथून आधीच पसार झाल्याने आढळून आला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.