12 crores fund sanctioned for 13 km roads in Malvan taluka | मालवण तालुक्यातील १३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

मालवण तालुक्यातील १३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीन रस्ता कामांना मंजुरीआमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

मालवण - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअतर्गत मालवण तालुक्यातील आणखी तीन रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. १३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये वायंगणी बौद्धवाडी ते सापळेबाग-तोंडवळी ५.४८५ किमी. रस्त्यासाठी ५ कोटी १४ लाख, विरण मालोंड ४.१०० किमी. रस्त्यासाठी ३ कोटी ९ लाख. व राज्य मार्ग ०४ ते आचरा गणपती मंदिर रामेश्वर मंदिर डोंगरेवाडी-पारवाडी या ३.६३ किमी. रस्त्यासाठी ३ कोटी ७३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर हि कामे मार्गी लागणार आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

तीनही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्ते खड्डेमय बनले होते. वाहनचालकांना कसरत करत या मार्गावरून वाहने चालवावी लागत होती. ही बाब लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१९-२० या वित्तीय वर्षात बॅच २ अंतर्गत या रस्त्यांच्या कामाची मंजुरी मिळवली आहे.

Web Title: 12 crores fund sanctioned for 13 km roads in Malvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.