पुणे: होलिकादहनानंतरच चंद्रग्रहणाचा योग; ३ मार्चला खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी धूलिवंदन
पुणे : यंदा होळी आणि चंद्रग्रहणाचा दुर्मीळ योग जुळून येत आहे. सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी भद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिकादहन करावे, अशी माहिती दाते पंचांगचे ज्योतिष अभ्यासक मोहन दाते यांनी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. ३ मार्च रोजी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण होणार असून, सायंकाळी ६:४८ वाजता ग्रहण मोक्ष होईल.
आंतरराष्ट्रीय: रशियाची भारताला ग्वाही: जागतिक अनिश्चिततेत खंबीर पाठिंबा
रशियाने भारताला ऊर्जा पुरवठ्यात खंड पडणार नाही, याची ग्वाही दिली. जागतिक इंधन संकट आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे खंबीर समर्थन, ऊर्जा, संरक्षण, संस्कृतीत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. कुडनकुलम प्रकल्प उत्तम उदाहरण आहे. संबंध दृढ राहतील.
मुंबई: CM फडणवीस यांचा आदेश; परदेश दौरे बंद, ताफा कमी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काटकसरीचे आदेश दिले आहेत. वाहनांचा ताफा निम्म्यावर, मंत्री-अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यावर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिसांकडून ताफ्यातील वाहनांची मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे.
व्यापार: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद
सलग तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार सावरला. BSE Sensex ४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७४,६०८ वर बंद झाला, तर Nifty 50 ३३ अंकांनी वधारून २३,४१२ या स्तरावर पोहोचला. बाजारातील वाढ मर्यादित असली तरी सलग पडझडीनंतर आलेल्या या रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसा आत्मविश्वास परतल्याचे दिसून आले.
व्यापार: RBI सरकारला देणार आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश; यापूर्वी दिलेले ₹२.६९ लाख कोटी...
भारतीय रिझर्व्ह बँके(RBI) कडून केंद्र सरकारला यंदाही विक्रमी लाभांश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निधी केंद्र सरकारसाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, RBI वित्त वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला तब्बल २.६९ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक लाभांश देऊ शकते.
महाराष्ट्र: मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, थट्टा नको: फडणवीस
जागतिक संकटात परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा द्या, थट्टा करू नका, असे फडणवीस म्हणाले. कठीण काळात देशासोबत उभे राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार खर्चकपात आणि स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देत आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र: १ जूनपासून स्वच्छतागृहे मोफत होणार; प्रताप सरनाईकांची माहिती!
एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे १ जूनपासून मोफत, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. खासगी बसच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणे प्रशासनाची जबाबदारी.
व्यापार: कंपनीच्या नफ्यात ४५% वाढ; दक्षिण आफ्रिकेतून ₹४,०४५ कोटींची ऑर्डर मिळताच 'हा' शेअर सुस्साट...
रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंगच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर इंट्रा-डे ट्रेडिंगदरम्यान तब्बल १३ ते १५ टक्क्यांनी वधारत १२० रुपयांच्या आसपास पोहोचला. या जोरदार वाढीमागे दोन मोठी कारणे असल्याचे मानले जात आहे. मार्च तिमाहीतील दमदार आर्थिक निकाल आणि दक्षिण आफ्रिकेतून मिळालेली ४,०४५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मोठी ऑर्डर.
महाराष्ट्र: मनमानी भाडेवाढ, अवैध ॲपवर कारवाई करा: प्रताप सरनाईक
खाजगी बस वाहतूकदारांकडून होणारी भाडेवाढ आणि अनधिकृत ॲप्सद्वारे प्रवाशांची लूट यावर शासन गंभीर आहे. भाडे नियंत्रण व तक्रार निवारणासाठी समिती उपाययोजना सुचवेल. प्रवाशांच्या लुटीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन, सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल.
व्यापार: "ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला
ऑस्ट्रेलियामध्ये बांधले जाणारे पहिले 'ट्रम्प टॉवर' आता ट्रम्प यांच्या नावाशिवाय उभं राहणार आहे. हा प्रकल्प जाहीर झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच स्थानिक विकासकानं 'ट्रम्प' हे नाव प्रकल्पातून हटवण्याचा निर्णय घेतला असून, ऑस्ट्रेलियामध्ये हा ब्रँड आता 'टॉक्सिक' झाला असल्याचं म्हटलं आहे.
परभणी: गंगाखेडमध्ये ७०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष; महत्त्वपूर्ण शोध
गंगाखेडमध्ये पेडजाई देवी टेकडीवर तेराव्या शतकातील मंदिराचे अवशेष सापडले. काळ्या बेसाल्ट दगडातील बांधकाम, प्राचीन जलकुंड, इंडो-इस्लामिक शैलीचा प्रभाव. खोदकामामुळे संवर्धनाची मागणी.
छत्रपती संभाजीनगर: मतीन पटेल कारवाईवर जलील आक्रमक; प्रशासनावर गंभीर आरोप
मतीन पटेल यांच्या मालमत्तेवरील कारवाईवर इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. या कारवाईला राजकीय सुडबुद्धी म्हणत, राज्यात 'गुंडाराज' सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. निदा खान प्रकरणी संजय शिरसाट यांच्या आरोपांना त्यांनी आव्हान दिले.
व्यापार: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहातील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असल्यची माहिती समोर आलीये. हा संपूर्ण वाद तब्बल साडेतीन दशकं जुन्या एका शेअर ट्रान्सफर प्रकरणाशी संबंधित आहे.
छत्रपती संभाजीनगर: इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट: संजय शिरसाटांचा थेट हल्ला
मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप, इम्तियाज जलील 'अर्बन टेररिस्ट', निदा खानला लपवले, निजामाची मानसिकता जोपासतात. शिरसाट यांनी जलील यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली, जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप. पटेल यांच्या जबाबावरून त्वरित कारवाईची मागणी.
व्यापार: ‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
Air India ने जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले. तसेच, प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले.
व्यापार: जागतिक तणावामध्येही देशात इंधन टंचाई नाही; जहाजे सुरक्षित
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याने जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी महत्त्वाची माहिती देत, भारतीय झेंडा असलेली १० तेल-गॅस वाहतूक जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर पडल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या जहाजांकडून कोणताही कर आकारण्यात आलेला नाही.
पुणे: ३ कोटी, मारहाण,‘त्या’ नोटमध्ये धक्कादायक खुलासे..!विवेक गटणे प्रकरणात १३ आरोपी फरार
दौंड : येथील माजी मुद्रांक विक्रेते तथा ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विवेक गटणे (वय ७२, रा. दौंड) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष शोधपथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
बीड: ६५ वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; अटक
काळेगाव येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या मुलीला घरात बोलावून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या भावाने वडिलांना सांगितले. पोलिसांनी आरोपीला पोक्सो कायद्यान्वये अटक केली, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
पुणे: घरगुती वाद इतका विकोपाला? आधी खोलीत बंद केलं, मग सासूवर सुनेने केले चाकूने सपासप वार
पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेने सासूचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापार: आधी पंतप्रधानांचं आवाहन, आता आयात शुल्क वाढ; ज्वेलरी स्टॉकमध्ये मोठी घसरण
केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानं ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे देशात सोन्या-चांदीची मागणी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात असून, बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत कोसळले.
जालना: अंबड: भरदिवसा फिल्मी स्टाईल लूट! सराफा व्यापाऱ्याच्या गाडीतून ७ किलो चांदी लंपास.
अंबडमध्ये धाडसी चोरांनी भर बाजारात सराफा व्यापाऱ्याच्या गाडीतून 7 किलो चांदीचे दागिने चोरले, ज्याची किंमत 16-17 लाख रुपये आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
व्यापार: राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे सुपूत्र आणि अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांच्या अक्समीक मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्रतीक यादव यांनी वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रतीक हे मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते.
पुणे: सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
पुणे : नसरापूर येथे लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या जखमा टणक वस्तूने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तूबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे.
व्यापार: एअर इंडियाचे गणित बिघडले; इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे अनेक मार्गांवरील उड्डाणे रद्द...
Air India : जेट इंधनाचे वाढते दर आणि पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्यामुळे Air India ला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळेच आता कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा कमी किंवा पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे.
व्यापार: आयात शुल्क वाढीनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; नवी किंमत काय?
केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.
व्यापार: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण
बुधवारी सकाळी जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींमुळे बाजारात मोठी हलचाल पाहायला मिळाली. सरकारनं सोने आणि चांदीच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्याचा थेट परिणाम वायदा बाजारावर झाला असून, सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. दुसरीकडे, शेअर बाजाराची सुरुवात वाढीसह झाली असली तरी, काही वेळातच बाजारात सुस्ती आली.
पुणे: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
पुणे - जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड (Redbird) कंपनीचे प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
व्यापार: मध्यमवर्गीयांना महागाईचा चटका? उदय कोटक यांचा आर्थिक संकटाचा इशारा
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या खिशावर होऊ शकतो, अशी भीती दिग्गज बँकर उदय कोटक यांनी व्यक्त केली आहे. आगामी काही आठवड्यांत भारताला या संघर्षाचे आर्थिक परिणाम सोसावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.
फिल्मी: मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांनी तृषाच्या 'या' चित्रपटासाठी घेतला मोठा निर्णय, दिली विशेष परवानगी
१० मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर जोसेफ विजय यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यातील ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयानंतर, आता त्यांनी सिनेरसिकांसाठी आणि विशेषतः अभिनेत्री तृषाच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता व्हेनेझुएलावर डोळा? ‘अमेरिकेचे ५१वे राज्य’ दर्शवणारी 'ती' पोस्ट चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचा एक नकाशा शेअर केला असून, त्यात त्या देशाला अमेरिकेचे “५१वे राज्य” म्हणून दाखवण्यात आले आहे.
व्यापार: सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
Gold-Silver Import Duty: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर आता सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने सोन्यासह इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. नव्या दरांची अंमलबजावणी १३ मे २०२६ पासून लागू झाली आहे.