Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...

राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...

Prateek Yadav Net Worth: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव यांचे आज लखनौ येथे निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:59 IST2026-05-13T11:57:42+5:302026-05-13T11:59:03+5:30

Prateek Yadav Net Worth: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव यांचे आज लखनौ येथे निधन झाले.

Prateek Yadav Net Worth: Away from politics..; What did Prateek Yadav do? How much was his wealth? Know | राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...

राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...

Prateek Yadav Net Worth News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे सुपूत्र आणि अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांच्या अक्समीक मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्रतीक यादव यांनी वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रतीक हे मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. 

अचानक प्रकृती बिघडल्याने निधन

प्रतीक यादव हे भाजप नेत्या आणि उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांचे पती होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना लखनऊमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

राजकारणापासून दूर...फिटनेस क्षेत्रात वेगळी ओळख

राजकारणापासून दूर राहून प्रतीक यादव यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख फिटनेस आणि व्यवसाय क्षेत्रात निर्माण केली होती. फिटनेसची विशेष आवड असलेल्या प्रतीक यादव यांनी लखनऊमध्ये ‘आयरन कोर फिट’ या नावाने हायएंड जिमची स्थापना केली होती.

२०१५ मध्ये सुरू झालेल्या या फिटनेस व्यवसायाच्या आज राजधानीत अनेक शाखा आहेत. अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या या जिममध्ये इटली आणि अमेरिकेतून आयात केलेली उपकरणे वापरण्यात येत असे. या जिममध्ये वार्षिक सुमारे ३५ हजार रुपयांपर्यंत फी आकारली जात होती. फिटनेसबाबत सोशल मीडियावरूनही ते लोकांना मार्गदर्शन आणि जनजागृती करत असत.

रिअल इस्टेट आणि ब्रँडिंग व्यवसायातही सक्रिय

फिटनेस व्यवसायासोबतच प्रतीक यादव रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डिलिंग, गुंतवणूक आणि बांधकाम क्षेत्रातही सक्रिय होते. तसेच अनेक ब्रँड्सच्या प्रमोशन आणि ब्रँडिंग प्रकल्पांमध्येही त्यांचा सहभाग होता. काही माध्यमांच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५.५ कोटी ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. तर वार्षिक उत्पन्न जवळपास १.५ कोटी रुपये असल्याचेही सांगितले जाते.

लक्झरी कार्सची विशेष आवड

प्रतीक यादव यांना महागड्या आणि लक्झरी कार्सची विशेष आवड होती. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश होता. काही अहवालांनुसार, त्यांच्या ताफ्यात तब्बल ५ कोटी रुपयांची लँबोर्गिनी कारदेखील होती.

राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

प्रतीक यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात असून यादव कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. प्रतीक यांच्या पश्चात पत्नी अपर्णा यादव आणि दोन मुली असा परिवार आहे.

Web Title : प्रतीक यादव: राजनीति से दूर, फिटनेस पर ध्यान, संपत्ति का खुलासा

Web Summary : मुलायम सिंह यादव के बेटे प्रतीक यादव का 38 वर्ष की आयु में निधन हो गया। वे 'आयरन कोर फिट' फिटनेस व्यवसाय के मालिक थे और रियल एस्टेट में उनकी रुचि थी। उनकी कुल संपत्ति लगभग ₹5.5 से ₹7 करोड़ आंकी गई थी। वे अपनी लग्जरी कार कलेक्शन के लिए जाने जाते थे।

Web Title : Prateek Yadav: Away from Politics, Fitness Focused, Net Worth Revealed

Web Summary : Prateek Yadav, Mulayam Singh Yadav's son, passed away at 38. He owned a fitness business, ‘Iron Core Fit,’ and had real estate interests. His net worth was estimated between ₹5.5 to ₹7 crore. He was known for his luxury car collection.