Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात LPG-पेट्रोलचा तुटवडा नाही, टॅक्स न भरता १० जहाजांनी होर्मुझ पार केले; सरकारची स्पष्टोक्ती

देशात LPG-पेट्रोलचा तुटवडा नाही, टॅक्स न भरता १० जहाजांनी होर्मुझ पार केले; सरकारची स्पष्टोक्ती

Oil and Gas Crisis: भारताची १३ हजाजे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:06 IST2026-05-13T13:04:47+5:302026-05-13T13:06:15+5:30

Oil and Gas Crisis: भारताची १३ हजाजे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात आहेत.

Oil and Gas Crisis: There is no shortage of LPG-petrol in the country, 10 ships crossed Hormuz without paying taxes; Government's clarification | देशात LPG-पेट्रोलचा तुटवडा नाही, टॅक्स न भरता १० जहाजांनी होर्मुझ पार केले; सरकारची स्पष्टोक्ती

देशात LPG-पेट्रोलचा तुटवडा नाही, टॅक्स न भरता १० जहाजांनी होर्मुझ पार केले; सरकारची स्पष्टोक्ती

Oil and Gas Crisis: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याने जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी महत्त्वाची माहिती देत, भारतीय झेंडा असलेली १० तेल-गॅस वाहतूक जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर पडल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या जहाजांकडून कोणताही कर आकारण्यात आलेला नाही.

होर्मुझ सामुद्रधुनीत अजूनही १३ भारतीय जहाजे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आतापर्यंत १० भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर आली असून, आणखी १३ भारतीय जहाजे त्या भागात आहेत. त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गित वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशात पेट्रोल, डिझेल, LPG किंवा कच्च्या तेलाची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, भारताकडे पुरेसा कच्च्या तेलाचा साठा असून, रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. देशात कुठेही पेट्रोल-डिझेल ‘ड्राय आउट’ची घटना घडलेली नाही

LPG वितरण सुरळीत 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत १ कोटी १४ लाख LPG बुकिंगच्या तुलनेत १ कोटी २६ लाख सिलेंडर वितरित करण्यात आले.व्यावसायिक LPG विक्री १७ हजार टनांपेक्षा अधिक झाली, तर ऑटो LPG विक्री ७६२ टनांहून अधिक झाली.

ऊर्जा आयातीसाठी भारताची नवी रणनीती

भारत आता केवळ मध्यपूर्वेवर अवलंबून न राहता विविध देशांकडून ऊर्जा आयात वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी आयात स्रोतांचे विविधीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

PM मोदींचे इंधन बचतीचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका जनसभेत बोलताना वाढत्या जागतिक संकटाचा उल्लेख केला होता. त्यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर करण्याचे, एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी काटकसर पाळण्याचे आवाहन केले होते.

Web Title : वैश्विक तनाव के बावजूद भारत में ईंधन की कमी नहीं, जहाज सुरक्षित निकले

Web Summary : भारत ने वैश्विक अशांति के बावजूद पर्याप्त ईंधन भंडार की पुष्टि की। दस जहाज कर-मुक्त होकर होर्मुज से सुरक्षित निकले। तेरह और जहाज रास्ते में हैं, सरकार सहायता कर रही है। ऊर्जा आयात में विविधता प्राथमिकता है।

Web Title : India Assures No Fuel Shortage Despite Global Tensions, Ships Pass Safely

Web Summary : India affirms ample fuel reserves despite global unrest. Ten ships safely navigated Hormuz, tax-free. Thirteen more are en route, with government support. Diversifying energy imports is a priority.