शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 4:40 PM

शेड्यूल सेक्समुळे बिझी लाइफस्टाईलमध्येही एक नवा तडका मिळतो. चला जाणून घेऊ कशाप्रकार शेड्यूल सेक्समुळे तुमच्या लैंगिक जीवनात तुम्ही नवा जोश आणू शकता.

(Image Credit : familyeducation.com)

शारीरिक संबंधामुळे कपल केवळ भावनिकदृष्टीनेच जवळ येतात असं नाही तर  त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. असं असलं तरी अनेकदा बिझी शेड्यूलमुळे लोक शारीरिक संबंध टाळतात किंवा त्यांना शक्य होत नाही. याचा प्रभाव त्यांच्या नात्यावरही पडतो. तुमच्यासोबतही असं होत असेल तर 'शेड्यूल सेक्स' तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेड्यूल सेक्स ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण याचे फायदेही अनेक आहेत. शेड्यूल सेक्समुळे बिझी लाइफस्टाईलमध्येही एक नवा तडका मिळतो. चला जाणून घेऊ कशाप्रकार शेड्यूल सेक्समुळे तुमच्या लैंगिक जीवनात तुम्ही नवा जोश आणू शकता.

शेड्यूल करा तयार

जर तुम्ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्हाला शेड्यूल सेक्सची टर्म नक्कीच माहीत असायला हवी. यात दोघांनी मिळून शारीरिक संबंधासाठी एक अशी वेळ ठरवावी लागते जेव्हा दोघेही पूर्णपणे मोकळे असाल. म्हणजे काय तर सगळंकाही ठरवून केलं जातं. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)

कॅलेंडरवर मार्क करा

जर तुम्ही दोघेही शारीरिक संबंधासाठी दिवस आणि वेळ ठरवत असाल तर ती लेखी ठेवा. हवं तर दिवस आणि वेळ कॅलेंडरवर लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील. इतकंच काय तर मोबाइलमध्ये अलार्मही लावू शकता.

सोबत घालवा चांगला वेळ

टेक्नॉलॉजीच्या या जगात सगळंच व्हर्चुअल झालं आहे. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही लोकांकडे वेळ नाही. अशात जर तुम्ही आधीच शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग कराल तर दिवसातला एक ठराविक वेळ तुम्ही सोबत असाल. बिझी लाइफमधून सोबत घालवलेला हा वेळ तुमचं नातं अधिक मजबूत करेल. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : ४८ तासांपर्यंत तुमच्यासोबत राहतो शरीरसंबंधानंतरचा हा फायदा....)

फिक्स राहतो वेळ

शेड्यूल सेक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही हे अव्हॉइड करू शकणार नाहीत. नाही तर या व्यस्त जीवनशैलीत आणि तणावाच्या वातावरणात तुमच्या डोक्यात शारीरिक संबंधाचा विचारही येणार नाही. शारीरिक संबंधाची वेळ फिक्स असेल तर तुम्ही त्यानुसार तुमची इतर कामे प्लॅन कराल.

तयारीसाठी मिळतो वेळ

जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग करता तेव्हा त्या क्षणांसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात नवा रोमांच हवा असेल तर शेड्यूल सेक्स चांगला पर्याय ठरू शकतो. याने शारीरिक संबंधाची उत्सुकताही कायम राहील. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप