(Image Credit : beenke.com)

कधी ना कधी तुम्ही नोटीस केलं असेल की, जसजसं महिलांचं वय वाढू लागतं तसतशी त्यांची कामेच्छा कमी होऊ लागते. वाढत्या वयासोबत महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ लागते. असं का होतं यामागे अनेक कारणे असतात. ज्यात शारीरिक आणि मानसिकही कारणे असू शकतात.

काय असतं कारण?

(Image Credit : medicalnewstoday.com)

कामेच्छा कमी होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत हायपोएक्टिव सेक्शुअल डिसऑर्डर असं म्हणतात. याचा प्रभाव १८ ते ५९ वयोगटातील महिलांमध्ये बघण्यात आला. सेक्स सायकॉलॉजिस्ट शेरिल किंग्सबर्ग सांगतात की, 'महिलांची सेक्शुअ‍ॅलिटी मल्टीफेसेड आणि फार कॉम्प्लिकेटेड असते. जी केवळ उपचाराने ठिक केली जाऊ शकत नाही.

हेही असू शकतं एक कारण....

फ्रिजिडिटी म्हणजे थंड होणं ही एक अशी अवस्था आहे ज्यात महिलांना उत्तेजना जाणवत नाही. अशात स्थितीत शक्य आहे की, महिलेमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आवश्यक उत्तेजना निर्माणच होत नसेल. इतकेच नाही तर शारीरिक संबंधावेळी फ्रिजिडिटीमुळे महिलांमध्ये कामेच्छा उत्पन्न होत नाही. त्यामुळे त्या पार्टनरला साथ देऊ शकत नाही. 

रिसर्च काय सांगतात?

(Image Credit : herbalstock.net)

अनेक रिसर्चमध्ये याला मेनोपॉज हे कारण मानलं गेलं आहे. म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यावर जास्तीत जास्त महिलांमध्ये कामेच्छा कमी बघण्यात आली आहे. याचं कारण हे सांगितलं जातं की, मासिक पाळी बंद झाल्यावर महिला शारीरिक संबंधाचा आनंद कमीच घेऊ शकतात. त्यांना ऑर्गॅज्म मिळवण्यासही समस्या येते.

२०१५ मध्ये नॉर्थ अमेरिकेतील एंडोक्रिनोलॉजी  अ‍ॅन्ड मेटाबॉलिज्म क्लिनीक जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित होता. त्यात दावा करण्यात आला होता की, वाढत्या वयासोबतच महिलांमध्ये लैंगिक समस्याही वाढू लागतात आणि अशा स्थिती मासिक पाळी बंद झाल्यावर अधिक बघण्यात येतात.

महिलांमध्ये कामेच्छा अशी का असते?

याबाबत काही तज्ज्ञांनी सांगितले की, वाढत्या वयात गुप्तांगाच्या कोरडेपणामुळे आणि एस्ट्रोजनचं प्रमाण असंतुलित होणे या कारणांमुळे त्यांच्या शारीरिक संबंधाचा अनुभव वेदनादायी ठरू शकतो. याच कारणामुळे मेनोपॉजच्या स्थितीत महिला शारीरिक संबंधाचा आनंद घेण्याऐवजी चिडचिड करतात.

काही रिसर्चमध्ये याचं कारण शारीरिक आणि मानसिक बदल सांगण्यात आलं आहे. हे बदल कसे असू शकतात हे खालीलप्रमाणे बघता येईल.

१) अनेकदा शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा आनंद न मिळणे, दोघांमध्ये वाद असणे, बाळाच्या जन्मामुळेही महिलांमध्ये कामेच्छा कमी होऊ शकते.

२) घरातील कामाचा तणाव, नोकरीचं प्रेशर किंवा कोणत्याही प्रकारच्या वादामुळेही कामेच्छा कमी होऊ शकते.

३) टेस्टोस्टेरॉन पुरूष आणि महिला दोघांमध्येही सेक्स ड्राइव्ह प्रभावित करण्याला जबाबदार मानला जातो. महिला जेव्हा २० वयात असतात तेव्हा त्यांच्या टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण फार जास्त वाढलेलं असतं. त्यानंतर ते हळूहळू कमी होत जातं.

४) अनेक प्रकारची अ‍ॅंटी-डिप्रेशन औषधं, ब्लड प्रेशर कमी करणारी औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन केल्यानेही महिलांची कामेच्छा कमी होऊ शकते.

(Image Credit : msn.com)

५) फ्रिजिडिटी मानसिक आणि शारीरिक कारणामुळे होते. अशात महिलांना पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना अवघडल्यासारखं वाटतं किंवा तणाव वाटतो. ज्यामुळे महिलांमध्ये कामेच्छा हळूहळू कमी होऊ लागते. नंतर ती पूर्ण नष्ट होते. सोबतच पार्टनरसोबत चांगले संबंध नसतील तरी सुद्धा कामेच्छा कमी होते.

६) काही महिला गर्भावस्थेचा विचार करून घाबरत असतात. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, त्यांना वाटू शकतं की, त्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करण्यासाठी तयार नाहीत किंवा गर्भावस्थेदरम्यान एखाद्या प्रकारच्या शारीरिक समस्येची भितीही त्यांना वाटू शकते.

या सर्व समस्यांवर उपाय आहेत, फक्त त्यासाठी महिलांना बोलावं लागले पार्टनरसोबत आणि डॉक्टरांना त्यांना वाटतं हे सांगावं लागेल. तरंच या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.'


Web Title: Sex Life: Why do Women Lose their Sexual Desire?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.