काही दिवसांपूर्वीच एक रिसर्च समोर आला होता, ज्यात सांगण्यात आलं होतं की, महिन्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांच्या तुलनेत आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. पण फॅक्ट हेही आहे की, शारीरिक संबंधामुळेही तुम्हाला हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

बेस्ट एक्सरसाइज

शारीरिक संबंध ठेवणे ही शरीरासाठी एक बेस्ट एक्सरसाइज मानली जाते. म्हणजे शारीरिक संबंध ठेवते वेळी शरीरात रक्तप्रवाह वाढतो आणि हृदयाची धडधड वाढते. याच कारणाने हार्ट अटॅकही येऊ शकतो. एका रिसर्चनुसार, शारीरिक संबंधाने हार्ट अटॅक येण्याचा धोका ३० लाख लोकांपैकी केवळ एकाला येऊ शकतो. पण याबाबत आधीच माहिती असलेली बरी. 

अति करू नका

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, आठवड्यातून दोन दिवस शारीरिक संबंध ठेवणं चांगलं  राहतं. पण काही कपल्स एन्जॉय करण्याच्या नादात दिवसातून अनेकदा शारीरिक संबंध ठेवतात. याने हृदयावर प्रेशर येऊ शकतं.

पोजिशन

लैंगिक जीवनात नवा तडका लावण्यासाठी अनेक कपल्स नवनवीन पोजिशन्स ट्राय करत असतात. पण यातील काही पोजिशन काही लोकांसाठी घातक ठरू शकतात. या पोजिशनमुळे ब्लड फ्लो बिघडू शकतो आणि हृदयावर प्रेशर वाढू लागतं. चांगलं हेच राहील की, जास्त वयात पोजिशनबाबत जरा सावधानता बाळगावी.

व्हायग्रा

बीएसी मेडिसिनच्या एका रिपोर्टमधून समोर आले आहे की, व्हायग्रा केवळ प्रायव्हेट पार्टवरच नाही तर हृदयावरही प्रभाव पाडते. याने हार्ट मसल्सवर परिणाम होऊन हार्ट अटॅकचं कारण ठरू शकते. त्यामुळे बरं होईल की, डॉक्टरच्या सल्ल्यानेच ही टॅबलेट घ्यावी.

वाइल्ड सेक्स

Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | <a href='https://www.lokmat.com/topics/sex-life/'>लैंगिक जीवन</a> :

अनेकदा रोमांचक काहीतरी करण्यासाठी कपल्स वाइल्ड सेक्स करू लागतात. याने फिजिकलसोबतच इमोशनल स्वरूपात शरीरावर फार जास्त प्रेशर येतं. याने ब्लड फ्लो वेगाने प्रभावित होऊन, हृदयाची ब्लड पंप करण्याची प्रकिया सुद्धा अधिक वेगाने होऊ लागते. एका लिमिटनंतर ही स्थिती अटॅकचं रूप घेऊ शकते.

थांबणं चांगलं 

Sex Life: Women are seeking Outer course instead of intercourse for orgasm | लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मसाठी महिला आउटरकोर्सच्या शोधात? काय आहे आउटरकोर्स?

असा कुठेच नियम नाही की, शारीरिक संबंधावेळी जास्त थकवा येत असेल तर थांबू नये. अनेकदा शारीरिक संबंधावेळी छातीत वेदना आणि प्रेशर आल्यासारखं वाटू शकतं, अशावेळी थोडं थांबलं तरी चालेल. नंतर या समस्येबाबत डॉक्टरांशी नक्की बोला.


Web Title: Sex life: Sex can cause heart attack know more about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.