लैंगिक जीवन : ...म्हणून मासिक पाळीत वाढते महिलांची उत्तेजना!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 03:40 PM2019-10-14T15:40:34+5:302019-10-14T15:48:04+5:30

एकीकडे आजही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याला काही लोक चुकीचं मानतात आणि यादरम्यान संबंध ठेवत नाहीत.

Reasons why some women feel more aroused during periods | लैंगिक जीवन : ...म्हणून मासिक पाळीत वाढते महिलांची उत्तेजना!

लैंगिक जीवन : ...म्हणून मासिक पाळीत वाढते महिलांची उत्तेजना!

googlenewsNext

एकीकडे आजही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याला काही लोक चुकीचं मानतात आणि यादरम्यान संबंध ठेवत नाहीत. पण असेही काही लोक आहेत जे पीरियड्स म्हणजेच मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध एन्जॉय करतात. मुळात यादरम्यान संबंध ठेवणं थोडं विचित्र वाटू शकतं, पण यावेळी शारीरिक संबंध ठेवणं असुरक्षित नक्कीच नाही. दोन्ही पार्टनरची मर्जी आणि त्यांची सहजता इथे महत्त्वाची ठरते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पीरियड्सदरम्यान महिलांची उत्तेजना अधिक वाढते. चला जाणून घेऊ याचं कारण....

इतर दिवसांच्या तुलनेत अधिक उत्तेजना

पीरियड्सदरम्यान तुमची कामेच्छा आणि पीरियड सायकल यावर हे अवलंबून असतं की, पीरिड्सदरम्यान तुमचा शारीरिक संबंधाचा मूड कसा असेल. काही महिलांना इतर दिवसांच्या तुलनेत पीरियड्सच्या दिवसातच अधिक उत्तेजना जाणवते.

पीरियड्समध्ये वाढते कामेच्छा

पीरियड्सच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी महिलांची कामेच्छा वाढते आणि याचा थेट संबंध शरीरातील हार्मोनल लेव्हलमध्ये होणाऱ्या बदलांशी असतो. पण याबाबत मेडिकल सायन्समध्ये काहीही उत्तर नाही की, दर महिन्यात होणाऱ्या ब्लड फ्लोदरम्यान कामेच्छा का वाढते. मात्र, यासाठी एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन जबाबदार सांगितले जातात.

हार्मोनचं प्रमाण वाढतं

पीरियड्सदरम्यान तुमच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये थोडी वाढ झाली तरी तुमची कामेच्छा वाढू शकते. तसा तर टेस्टोस्टेरॉन मेल सेक्स हार्मोन आहे. पण महिलांच्या ओव्हरीमध्येही याचं फार कमी प्रमाणात उत्पादन होतं. सोबतच पीरियड्सदरम्यान प्रोजेस्टेरॉन हार्मोनही याला जबाबदार असतात.


Web Title: Reasons why some women feel more aroused during periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.