लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वायग्रापेक्षाही वरचढ ठरतं ऑलिव्ह ऑइल - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 04:07 PM2019-02-27T16:07:47+5:302019-02-27T16:09:19+5:30

जास्तीत जास्त पुरूषांना ज्या वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यात इन्फर्टिलिट ही मुख्य समस्या आहे.

Olive oil can boost sexual performance cures men's infertility problem says new research | लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वायग्रापेक्षाही वरचढ ठरतं ऑलिव्ह ऑइल - रिसर्च

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वायग्रापेक्षाही वरचढ ठरतं ऑलिव्ह ऑइल - रिसर्च

जास्तीत जास्त पुरूषांना ज्या वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यात इन्फर्टिलिट ही मुख्य समस्या आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचं सेवन सरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ही बाब समोर आली आहे की, ऑलिव्ह ऑइल सेक्शुअली परफॉर्मन्स वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. 

हा रिसर्च ग्रीसमध्ये करण्यात आला. त्यात हा दावा करण्यात आला आहे. ज्या पुरूषांना त्यांची लैंगिक क्षमता वाढवायची आहे त्यांनी नियमितपणे ऑलिव्ह ऑइलचा वापर केला तर ते शारीरिक संबंधावेळी चांगलं परफॉर्म करू शकता. सोबतच त्यांची इन्फर्टिलिटीची समस्याही दूर होईल. रिसर्चमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, हा उपाय वायग्रापेक्षाही अधिक उपयोगी ठरू शकतो. 

ग्रीसच्या यूनिव्हर्सिटी ऑफ एथेंसच्या संशोधकांनी यावर रिसर्च केला. ते म्हणाले की, जर पुरूषांनी आठवड्यात ९ चमच ऑलिव्ह ऑइलचा वापर करतील तर याने पुरूष नपुंसकतेमध्येही ४० टक्क्यांनी कमतरता येईल. 

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ६७ सरासरी वय असलेल्या ६६० लोकांचा सहभाग करून घेतला होता. रिसर्चमधून असं आढळलं की, ज्या लोकांनी त्यांच्या आहारात ऑलिव्ह ऑइलचा नियमितपणे समावेश केला होता, त्यांना इतरांच्या तुलनेत कमी समस्या आल्या. इतकेच नाही तर त्यांच्या लैंगिक क्षमतेतही फार सुधारणा बघायला मिळाली. या लोकांनी त्यांच्या आहारात फळं, भाज्या, मासे आणि ड्राय फ्रूट्सचा व ऑलिव्ह ऑइलचा समावेश केला होता. 

ऑलिव्ह ऑइल कसं करतं काम?

ऑलिव्ह ऑइल मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढवतं. याने इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर होते. या रिसर्चमध्ये ज्या लोकांना लैंगिक जीवनासंबंधी समस्या होत्या त्यांना ऑलिव्ह ऑइलचा समावेश आहारात करण्यास सांगण्यात आले होते. 

वायग्राऐवजी ऑलिव्ह ऑइल

वायग्रा जरी काही लोकांसाठी फायदेशीर ठरत असेल पण याचेही अनेक दुष्परिणाम आहेत. याचं जास्त आणि फार जास्त काळासाठी सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ऑलिव्ह ऑइल हे नैसर्गिक आहे. त्यामुळे याचे काही साइड इफेक्ट होणार नाहीत. तसेच ऑलिव्ह ऑइलच्या वापराने डायबिटीज, हाय बीपी आणि जाडेपणासारख्या समस्या होण्याचा धोकाही कमी असतो. 

Web Title: Olive oil can boost sexual performance cures men's infertility problem says new research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.