Satara: अल्पवयीन मुलाने वसतिगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 14:16 IST2024-09-27T14:15:57+5:302024-09-27T14:16:41+5:30
लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील एका महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात एका १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. ही घटना दि. ...

Satara: अल्पवयीन मुलाने वसतिगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट
लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील एका महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात एका १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. ही घटना दि. २५ रोजी रात्री २ वाजता घडली आहे. आत्महत्या केलेला युवक अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित अल्पवयीन मुलाने वसतिगृहातील खिडकीच्या गजाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसतिगृहात खळबळ उडाली. लोणंद पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
संबंधित मुलाने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समोर आले नाही. तो अकरावीत शिकत होता. लोणंद पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार भिसे हे अधिक तपास करीत आहेत.