‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत तरुणास मारहाण, साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Updated: June 14, 2024 19:22 IST2024-06-14T19:20:55+5:302024-06-14T19:22:13+5:30

सातारा : ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

Youth assaulted in Satara, case registered against four pepole | ‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत तरुणास मारहाण, साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद 

‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत तरुणास मारहाण, साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद 

सातारा : ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी संदीप भरत पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार युवराज मुरारी (पूर्ण नाव नाही रा. पाॅवर हाउस झोपडपट्टी, सातारा), बाॅबी देवकर (पूर्ण नाव नाही. मोरे काॅलनी, शाहूपुरी, सातारा), धीरज जयसिंग ढाणे (रा. ढोणे काॅलनी, सातारा) आणि अनोळखी एकावर गुन्हा नोंद झाला आहे.
दि. १२ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनीत मारहाणीचा प्रकार घडला.

तक्रारदार संदीप पवार याला संशयित युवराज मुरारी याने आकाश नलवडे याच्याबरोबर का फिरतो. त्याने काल माझ्यासोबत भांडणे केली आहेत असे म्हणत फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. तसेच इतर तिघांकडूनही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी तक्रारदाराच्या पँटच्या खिशातून दीड हजार रुपये काढून घेण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Youth assaulted in Satara, case registered against four pepole