सातारा: माझ्या बायकोच्या मोबाइलमध्ये तुझा मोबाइल नंबर आहे. तू वस्तीत ये. तुझे हात-पाय मोडतो, अशी धमकी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाने दिली. ही घटना सातारा पंचायत समितीसमोर दि. १४ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण सातारा तालुक्यातील एकाच गावात राहणारे आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख आहे. एका ३० वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय तरुणाला फोन केला. माझ्या बायकोच्या मोबाइलमध्ये तुझा नंबर हाय. तू ये. तुझे हात-पाय मोडतो, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर संबंधित ३५ वर्षीय तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर त्याने तक्रार दाखल केली. याबाबत महिला पोलिस उपनिरीक्षक भालेकर या अधिक तपास करीत आहेत.