टेम्पो-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:53+5:302021-01-08T06:06:53+5:30

फलटण : फलटण ते पंढरपूर रस्त्यावर पवारवस्ती-विडणी गावाच्या हद्दीत टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात युवक जागीच ठार ...

Young man killed in tempo-bike collision | टेम्पो-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

टेम्पो-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

फलटण : फलटण ते पंढरपूर रस्त्यावर पवारवस्ती-विडणी गावाच्या हद्दीत टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात युवक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुहास मारुती गरगडे (वय २२, रा. गुणवरे, ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबतची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी फलटण ते पंढरपूर रस्त्यावर पवारवस्ती-विडणी गावाच्या हद्दीत पंढरपूरकडून येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात सुहास गरगडे जागीच ठार झाला. या प्रकरणी टेम्पोचालक मारुती विठ्ठल कोडग (४०, रा. आवंडी, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

Web Title: Young man killed in tempo-bike collision