Satara: क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:37 IST2025-06-03T16:37:01+5:302025-06-03T16:37:17+5:30
कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील देशपांडेवाडी किसरुळे येथील शुभम सुरेश कदम (वय १८) हा युवक रविवारी सायंकाळी पाचच्या ...

Satara: क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील देशपांडेवाडी किसरुळे येथील शुभम सुरेश कदम (वय १८) हा युवक रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावातच मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळल्यानंतर तो त्या ठिकाणी बसला असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाक येथे आणले. त्यावेळी तो उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यास पुढील उपचारासाठी कऱ्हाडला हलविण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शुभम कदम हा पाटण येथील शासकीय तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, आजी व लहान बहीण आहे. त्याचे वडील हे गेली अनेक वर्षे अर्धांगवायू या आजाराने अंथरुणावरच आहेत.