शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जखमी चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Updated: June 30, 2014 23:52 IST

आई अत्यवस्थ : वाढेफाटा अपघातातील मृतांची संख्या दोनवर

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील वाढे फाट्यावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा रात्री अकरा वाजता खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्याची आई जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मामा शिवाजी राठोड (वय २२ , रा. उटगी लमाणतांडा, ता. जत, जि. सांगली) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला होता.मामा शिवाजी राठोड हा आजारी असलेला भाचा सोहम चव्हाण (वय २) याला दुचाकीवरून दवाखान्यात नेत होता. यावेळी बहीण सायव्वा चव्हाण सोबत होती. वाढेफाट्यावर महामार्ग ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना कोल्हापूरकडून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये शिवाजी राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर भाचा सोहम याचा रात्री अकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायव्वा हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचीही प्रकृती चिंताजनक आहे.अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून, अद्याप तो पोलिसांना सापडला नाही. शिवाजी राठोडने सांगली येथे डी. फार्मसीचे शिक्षण घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी त्याने साताऱ्यातील एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत दिली होती. नोकरी लागण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. पाच बहिणींमध्ये एकुलता एक शिवाजीचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (प्रतिनिधी)