Satara: युवतीचा विनयभंग; भावाला पिस्तूल दाखवून मारहाण, नऊजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:49 IST2025-09-10T18:48:46+5:302025-09-10T18:49:01+5:30
दहाजणांवर विरोधात तक्रार

Satara: युवतीचा विनयभंग; भावाला पिस्तूल दाखवून मारहाण, नऊजणांवर गुन्हा दाखल
सातारा : एका युवतीचा विनयभंग करून भावाला पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी सुमारे दहाजणांवर विरोधात तक्रार देण्यात आली आहे, तर दुसऱ्या तक्रारीवरून नऊजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीच्या फिर्यादीनुसार पप्पू ऊर्फ संजय लेवे, निखिल वाघ, धनंजय शिंदे यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी साताऱ्यात घडली. पीडित तरुणी दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी संशयिताने विनयभंग केला. तसेच कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी बोलावून त्यांनी भावाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर भावाच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली, असेही तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी तक्रार पप्पू लेवे (रा. गडकर आळी, सातारा) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोन्या जाधव, बंडा जाधव, शुभम जाधव यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी यश घाडगे व ऋतुराज शिंदे यांची भांडणे का मिटवली, असे म्हणून कोयत्याने व पाइपने मारहाण केली.