कारागृहातून सुटल्यानंतर महिलेचा पुन्हा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:44 IST2019-05-10T22:43:20+5:302019-05-10T22:44:42+5:30
म्हसवड : अत्याचाराचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात आठ महिने राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीने महिलेचा पुन्हा विनयभंग ...

कारागृहातून सुटल्यानंतर महिलेचा पुन्हा विनयभंग
म्हसवड : अत्याचाराचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात आठ महिने राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीने महिलेचा पुन्हा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकाराची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपीला अटक केली.
दादा उर्फ हणमंत खंडू जाधव, असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादा जाधव याने संबंधित पीडित महिलेचा यापूर्वी विनयभंग केला होता. या गुन्ह्यात तो आठ महिने कारागृहात होता. गेल्या चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून सुटला. त्यानंतर त्याने पीडित महिलेला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेने त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिच्या मोबाईलवर एसएमएस पाठविले. परंतु त्यालाही पीडित महिलेने दादा दिली नाही.
संंबंधित महिला आपल्या मुलांना क्लासला सोडण्यासाठी जात असताना त्याने पीडित महिलेचा पाठलाग केला. घरी गेल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन दादा जाधवला अटक केली.