शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता 

By नितीन काळेल | Updated: September 9, 2024 18:48 IST

तर क्विंटलला ३०० रुपये तरी जादा मिळणार 

सातारा : सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने केंद्र शासनाने राज्यात हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे. यामुळे सध्याच्या दरानुसार ३०० रुपये तरी क्विंटलला जादा मिळतील. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. परंतु, मागील अनुभव पाहता नियमामुळे आणि सक्षम यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचा खरंच फायदा होणार का? याबाबत साशंकता आहे.राज्यात मागील काही वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात तर यावर्षी ९६ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. पण वर्षभरात क्विंटलचा दर साडेचार हजार रुपयांदरम्यानच राहिला. यामुळे शेतकऱ्यांवर घरात सोयाबीन ठेवण्याची वेळ आली. सध्या खरिपातील सोयाबीन काढणीची वेळ आली तरी हमीभावाएवढाही दर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी मान्यता दिली आहे.

सोयाबीन उत्पादकांना मदत व्हावी आणि बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का? याविषयी साशंकता आहे. अशा केंद्रांमुळे निराशा होत आहे. शासकीय यंत्रणा कमकुवत ठरत आहे. केंद्रावर सोयाबीन नेल्यास दर्जा नाही, घाण-माती आहे, ग्रेडमध्ये बसत नाही, अशी कारणे सांगून हमीभावही टाळला जातो, असे शेतकरी सांगतात.

  • जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र - ९६ हजार हेक्टर
  • सध्या मिळणारा क्विंटलचा दर - सरासरी ४५०० ते ४६००
  • हमीभाव - ४८९२

केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तरी केंद्रांवर व्यापारीधार्जिणे धोरण असते. नियम आणि विविध कारणे सांगून दर मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन कोठेही विकले आणि पक्की पावती आणली तर हमीभावाएवढा दर मिळण्यासाठी वरील फरकाची रक्कम द्यावी. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी