शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

कोण म्हणतं... साताऱ्यात भारनियमन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 6:46 PM

राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती अडचणीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात दिवसा प्रकाश पालिकेच्या कृपेने सकाळी दहा वाजले तरी पथदिवे सुरूच

सातारा , दि. १४ : राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती अडचणीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. विहिरींना पाणी आहे; परंतु मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न सतावत आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापराच्या विजेचेही भायनियमन सुरू आहे. त्याच्या वेळा निश्चित नाहीत.

या संदर्भात ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाºयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता भारनियमन असल्याचे सांगितले जाते. वीज कधी गेली?, कधी येणार? भारनियमन कधीपासून सुरू झाले, हे प्रश्न विचारले तर एकाही प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही.

केवळ वरूनच भारनियमन सुरू झाले आहे. हे उत्तर दिले जाते. फार-फार तर आम्हाला जास्त माहिती देऊ नका, असे आदेश आहेत. तुम्ही साहेबांनाच विचारला,असे खासगीत सांगितले जाते.

दिवाळी सण काही दिवसांवर आली असल्याने फराळ बनविण्यासाठी दळणं, विद्युत उपकरणांच्या विक्रीसाठी विजेची गरज असते. त्यातच भारनियमन सुरू झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील मंगळवार पेठ, काळा पत्थर, व्यंकटपुरा, मंगळवार तळे परिसरात सकाळी आठ-नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. सध्या लवकरच दिवस उजेडात असल्याने सकाळी सात वाजताच ऊन पडलेले असते; परंतु नऊ-साडेनऊ वाजले तरी वीज सुरूच असते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले पै-पाहुणे मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.ग्राहक मात्र अंधारातचवीज भारनियमन सुरू करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांमधून जाहीर केले जाते. यामध्ये कोणत्या भागात कधी, वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. यामुळे ग्राहक त्यांच्या कामाचे नियोजन करू शकतात. यंदा मात्र चोर पावलाने वीज भारनियमन केले जात आहे. विचार केली तरी अधिकारी, कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन