कोण म्हणतं... साताऱ्यात भारनियमन सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:53 IST2017-10-14T18:46:00+5:302017-10-14T18:53:44+5:30
राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती अडचणीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

कोण म्हणतं... साताऱ्यात भारनियमन सुरू!
सातारा , दि. १४ : राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती अडचणीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. विहिरींना पाणी आहे; परंतु मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न सतावत आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापराच्या विजेचेही भायनियमन सुरू आहे. त्याच्या वेळा निश्चित नाहीत.
या संदर्भात ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाºयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता भारनियमन असल्याचे सांगितले जाते. वीज कधी गेली?, कधी येणार? भारनियमन कधीपासून सुरू झाले, हे प्रश्न विचारले तर एकाही प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही.
केवळ वरूनच भारनियमन सुरू झाले आहे. हे उत्तर दिले जाते. फार-फार तर आम्हाला जास्त माहिती देऊ नका, असे आदेश आहेत. तुम्ही साहेबांनाच विचारला,असे खासगीत सांगितले जाते.
दिवाळी सण काही दिवसांवर आली असल्याने फराळ बनविण्यासाठी दळणं, विद्युत उपकरणांच्या विक्रीसाठी विजेची गरज असते. त्यातच भारनियमन सुरू झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील मंगळवार पेठ, काळा पत्थर, व्यंकटपुरा, मंगळवार तळे परिसरात सकाळी आठ-नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. सध्या लवकरच दिवस उजेडात असल्याने सकाळी सात वाजताच ऊन पडलेले असते; परंतु नऊ-साडेनऊ वाजले तरी वीज सुरूच असते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले पै-पाहुणे मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.
ग्राहक मात्र अंधारातच
वीज भारनियमन सुरू करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांमधून जाहीर केले जाते. यामध्ये कोणत्या भागात कधी, वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. यामुळे ग्राहक त्यांच्या कामाचे नियोजन करू शकतात. यंदा मात्र चोर पावलाने वीज भारनियमन केले जात आहे. विचार केली तरी अधिकारी, कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत.