कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात, पुणे जिल्ह्यातील दहा जखमी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 17:31 IST2017-12-15T17:26:49+5:302017-12-15T17:31:42+5:30
कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात, पुणे जिल्ह्यातील दहा जखमी,
सातारा : कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दत्ताभाऊ पोळ, भाऊ पोळ, अभिषेक पोळ, विक्रम बोडके, कविता पोळ, मनोहर पोळ, पुजा भोसले, छाया पोळ, मंगल पोळ, इंदुबाई वाडेकर, अर्मिला (सर्व रा. वळवंटी, पो. करंजगाव मावळ, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
हे सर्वजण गुरुवारी टेम्पोने कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूरहून गावी यायला निघाले. पुणे, बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर येथे रात्री बाराच्या सुमारास हे सर्वजण आले.
यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोमधील दहाजण जखमी झाले. या अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.
जखमींना तत्काळ टेम्पोमधून बाहेर काढून काही नागरिकांनी रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.