धुळ्यानजिक पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:45 PM2017-12-05T15:45:45+5:302017-12-05T15:46:50+5:30

अपघात : महामार्गावरील पहाटेची घटना

A truck rammed into a dusty pickup van, killing one | धुळ्यानजिक पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १ ठार

धुळ्यानजिक पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १ ठार

Next
ठळक मुद्देअज्ञात ट्रकला मागून पिकअप व्हॅनची जोरदार धडकमहामार्गावरील पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली घटनाचाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चाळीसगाव चौफुलीजवळ पिक व्हॅनची ट्रकला जोरदार धडक बसली़ या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ 
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून टमाटे भरुन धुळ्याकडे येणाºया ट्रकला पिकअप व्हॅनने मागावून जोरदार धडक दिली़ या अपघातात एकजण जागीच ठार झाला़ मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास माल वाहतूक करणाºया ट्रकने ब्रेक मारला़ यावेळी रस्त्यावर धुके असल्यामुळे अचानक गती कमी झालेल्या ट्रकला मागून येणारी एमएच १५ डीके १०१४ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली़ या अपघातात पिकअप वाहन चालक रविंद्र साहेबराव आहेर हा ३० वर्षाचा तरुण जागीच ठार झाला़ घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती़ घटना घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे़  
अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस तातडीने दाखल झाले होते़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रेमराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ बी़ आहेर करीत आहेत़ 

Web Title: A truck rammed into a dusty pickup van, killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.