शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कधी कोरेगाव,किन्हई तर कधी महाड!

By admin | Updated: August 14, 2015 00:17 IST

क्राईम डायरी-- पाच महिने गुंगारा : खुनातील मुख्य संशयिताने सातत्याने बदलली ठिकाणे

सातारा : कधी तो रहिमतपुरात असल्याची ‘टिप’ मिळायची, तर कधी किन्हईमध्ये. कधी तो थेट महाडला असल्याची माहिती मिळायची. कधी तो साताऱ्यात असायचा, तर कधी कोरेगावात. परंतु पोलीस त्या ठिकाणी पोहोचायच्या काही मिनिटे आधीच तो तिथून पसार झाल्याचे समजत असे.बजरंग गायकवाड खून प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय लालासाहेब पवार याने सुमारे पाच महिने सतत जागा बदलून पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर आणि एकदा तर पोलिसांच्या तावडीतूनही पलायन केल्यानंतर गुरुवारी सकाळी तो पुन्हा जाळ्यात सापडला. त्याचा माग काढण्यासाठी तालुका पोलिसांनी प्रयत्नांत सातत्य ठेवले होते. अक्षय केवळ जागाच बदलत नव्हता, तर मोबाइल फोनही तो वारंवार बदलत होता. त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात खुनाव्यतिरिक्त जबरी चोरीचाही गुन्हा दाखल आहे.तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी अक्षयची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तशी व्यूहरचना केली. कोरेगाव तालुक्यात, विशेषत: रहिमतपूर परिसरात अक्षयचे ‘नेटवर्क’ मोठे असल्याचे दिसून आले होते. अटक करण्यात आलेले काही संशयितही रहिमतपूर, अंभेरी परिसरातील आहेत. त्यामुळे तेथे तो वारंवार जाण्याची शक्यता होती. तेथील माहिती मिळत राहावी, यासाठी सापळा रचण्यात आला. ही जबाबदारी सचिन भोसले या कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली आणि त्यांनी ती चोख पार पाडली. अक्षय रहिमतपुरात असल्याची ‘टिप’ वेळेवर मिळाली. बुधवारी रात्रभर चाललेल्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, संभाजी गबाले, संदीप पाटील, गोकूळ बोरसे, धनंजय जाधव यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)3 2 1 असा सापडला अक्षय...बुधवारी रात्री साडेबारा वाजता तालुका पोलिसांना वाई पोलिसांचा दूरध्वनी आला. ‘अक्षय पवार कसा दिसतो, हे आम्हाला माहीत नाही. त्याचा फोटो पाठवा,’ असे सांगण्यात आले. फोटो मिळाल्यानंतर तशा वर्णनाचा युवक वाई परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तालुका पोलिसांची एक टीम तिकडे रवाना झाली. तथापि, तो अक्षय नव्हता.रात्री अडीच वाजता पुन्हा फोन आला. अक्षय मेढा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक टीम तिकडे पाठविली. अक्षय मेढ्यात होता; मात्र काही तासांपूर्वीच तो तिथून निघून गेल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अक्षय रहिमतपुरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलिसांनी दोन टीम तयार केल्या. एक टीम पुढे गेली आणि मागून काही मिनिटांच्या अंतराने दुसरी टीम रवाना झाली. पुढील टीममध्ये तीन कर्मचारी होते. समजलेल्या ठिकाणी अक्षय दिसताच तिघांनी त्याला पकडले, तेव्हा साडेसहा वाजले होते.