चिंता नको; पक्ष एकसंध; आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:59 AM2024-02-13T11:59:34+5:302024-02-13T12:00:03+5:30

कराड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ...

We will go to the people's court, Prithviraj Chavan reaction to Ashok Chavan resignation | चिंता नको; पक्ष एकसंध; आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

चिंता नको; पक्ष एकसंध; आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

कराड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहतील, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, आम्ही लढू आणि जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे..

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसांपासून सूतोवाच होत होतं.

आज आम्ही बाळासाहेब थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेची उमेदवारी भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. या सर्व परिस्थितीत आम्ही ज्या-ज्या विधिमंडळ सदस्य आणि नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, त्यातील कुणीही जाणार नाही. भाजपकडून मुद्दाम वावड्या उठविल्या जात आहेत. नावं घेतली जात आहेत पण त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये”
काँग्रेस पक्ष हा जनतेमध्ये न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळे घडतंय ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.

भाजपला आज निवडणुकीला सामोर जायचं धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून आपल्याला काही संधी मिळते का? हे पहाण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. नेतेमंडळी गेले तरी त्यांना मते देणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा खरं चित्र दिसेल. आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत. असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: We will go to the people's court, Prithviraj Chavan reaction to Ashok Chavan resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.