शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवार्ता!, सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; शेवटची फेरी मारून टँकर परतला

By नितीन काळेल | Updated: October 18, 2024 19:23 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्यावस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग पावसाचा असूनही कोयनासह प्रमुख मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. परिणामी ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळी उपाययोजना सुरू होत्या. त्याचवेळी पूर्व भागातील तालुक्यातून पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने टँकर सुरू झाले.नोव्हेंबर महिन्यापासून टँकरला सुरूवात झाली. त्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टँकर सुरू झाले. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईने उग्र स्वरुप गाठले. यामध्ये ७५ टक्के माण तालुका टंचाईच्या फेऱ्यात होता. तसेच खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टँकर सुरू होते. यामध्ये माण तालुक्यात ७१ गावे आणि ४४५ वाड्या तहानलेल्या होत्या. माणमधील १ लाख २६ हजार नागरिक आणि १ लाख ३७ हजारांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता. खटाव तालुक्यातही ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी ४१ टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांची तहान अवलंबून होती. फलटण तालुक्यातही ४२ गावे ११३ वाड्या, कोरेगाव तालुक्यात ३३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यातही टॅंकर सुरू होता. त्यामुळे मे महिन्यात ३ लाख ३२ हजार नागरिक आणि अडीच लाखांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस