शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

१.५४ लाख लोकांना ६८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 18, 2014 23:35 IST

कऱ्हाड, पाटणला सुकाळ : माण, खटावला दुष्काळ

सातारा : जिल्ह्याच्या डोंगरी भागात संततधार पावसाने शेतकरी सुखावला असला दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांत मात्र भयावह परिस्थिती आहे. दरम्यान, दुष्काळी भागाबरोबरच काही सधन तालुक्यांतही टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, येथेही पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वी जावळी, पाटण आणि कऱ्हाड या तीन तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, जोरदार पावसामुळे टँकर पुरवठा बंद झाला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असले तरी काही ठिकाणी अजूनही शासन यंत्रणा पोहोचली नसल्याची परिस्थिती आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत असला तरी तो अजूनही पुरेसा नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आजमितीस ६४ टँकरने ३२९ गावे आणि वाडी-वस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८५ गावे आणि २४४ वाड्यांचा समावेश असून, तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ५४ हजार ८९ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावांतील ४८ हजार ८०१ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १९ गावांतील ३८ हजार ४१२ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.फलटण तालुक्यात १० टँकरने १० गावे व ७२ वाड्यांतील २० हजार ४४८ लोकांना तर वाई तालुक्यात २ टँकरने २ गावांतील ४ हजार ८८९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भयावह परिस्थितीजिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत काही भागांत भयावह परिस्थिती आहे. माण आणि खटाव तालुक्यांत पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७० वाड्यांतील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.